Home जालना आसई येथे दक्षिणमुखी हनुमान संस्थान ऐतीहासिक युद्धभूमी आसई नगरीत यात्रा महोत्सव

आसई येथे दक्षिणमुखी हनुमान संस्थान ऐतीहासिक युद्धभूमी आसई नगरीत यात्रा महोत्सव

251
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_204017.jpg

आसई येथे दक्षिणमुखी हनुमान संस्थान ऐतीहासिक युद्धभूमी आसई नगरीत यात्रा महोत्सव
गुढी पाडवा निमीत्त पौराणिक सोंगाचा कार्यक्रम
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 06/04/2024
याविषयी सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील आसई ह्या गावची ऐतिहासिक युद्धभूमी म्हणून ओळख आहे. येथील हनुमान मंदीर हे दक्षिण मुखी असून हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. या गावामध्ये गुढीपाडव्या निमित्त खूप मोठी यात्रा भरते. तसेच पारंपरिक सोंगाचा कार्यक्रम आयोजित केला जात असतो. सोंगाच्या कार्यक्रमाचे उदघाटन.. मा. श्री प्रतापराव इंगळे / पी. आय/ पोलीस स्टेशन जाफराबाद यांच्या हस्ते होणार आहे.आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चैत्र शु.1 गुढीपाडवा दिनांक 09/04/2024 रोज मंगळवार या दिवशी श्री गणेश व सरस्वतीचे पूजन करून रात्री 8.30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत पारंपरिक सोंगाचे अयोजन केले आहे. रात्री 12 वाजता हनुमंताची स्वारी निघेल.ही स्वारी श्री प्रकाश विक्रम पाटील इंगळे हे घेतात. आणि सकाळी 10/04/2024 रोज बुधवार ला सकाळी 6 ते 8 वाजता देवीची स्वारी निघेल.आसई गावची परंपरा टिकवत गावातून सोंगाचा कार्यक्रम ठेवला जातो. गेल्या अनेक वर्षापासून देवीची स्वारी ही श्री विलास पाटील इंगळे मा. सरपंच आसई हे देवीच्या स्वारीचे मानकरी असतात. पोत/ दैत्य/हा मान कोरडे परीवाराला असतो. त्यांना देवीच्या रुपात सजवून देवीचा टोप इतर शृंगार करून सजवतात व देवीची स्वारी पूर्ण गावातून वाजत गाजत निघते. तसेच देवी स्वारी समोर चे पोत / दैत्य/ पारंपरिक वेशभूषेत असतात. प्रत्येक घरासमोर सडा -रांगोळी असते आणि प्रत्येक घरासमोर देवीची पूजा केली जाते. तसेच देवीची स्वारी पाहण्यासाठी व दर्शनासाठी भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातून व परिसरातून खूप मोठया प्रमाणात नागरीक व महिला उपास्थित असतात.यामागे गावकऱ्यांची फार मोठी आस्था असते.
दिनांक 09/04/2024 .रोजी रात्री सोंगे निघतात .यात्रेतील सोंग व त्यांची नावे….. देवदेवता…… झाड/ झुडी. काॅमेडी – श्री प्रभू शास्त्री , प्रवीण कुदर, विजय, कोरडे, विठ्ठल इंगळे, श्री गणेश इंगळे, सुनिल इंगळे, विदूषक – श्री तेजराव पाटील इंगळे, सूत्रधार – श्री साहेबराव पाटील कोरडे, गणपती – मनोज भगवान पाटील इंगळे, सरस्वती – श्री गजानन एकनाथ पाटील इंगळे,कच्छी – विजय अंबादास पाटील इंगळे, आगेतळ – नामदेव पाटील इंगळे, सूर्यतळ – शेनफड पाटील इंगळे,कृष्ण – श्री ईश्वर शालिकराम पाटील इंगळे/शिक्षक, राधा – श्री सुखदेव फकिरबा पाटील इंगळे…….महाभारत सोंगाची नावे… भीम – बालाजी पाटील इंगळे,अर्जून – श्री कृष्णा पाटील इंगळे शिक्षक,धर्म – विजय पाटील कोरडे, सहदेव – नंदू पाटील इंगळे, नकुल – श्री शेनफड पाटील इंगळे, द्रौपदी – श्री सुनिल पाटील इंगळे,कृष्ण – श्री शरद पाटील इंगळे आर्मी , दुर्योधन – श्री बालू पाटील इंगळे शिक्षक,शकोनी मामा – श्री कृष्णा पाटील इंगळे शिव व्याख्याते, धृतराष्ट्र – श्री राजू पाटील इंगळे टेलर, दुशासन – अंकुश पाटील इंगळे, विदुर – श्री परमेश्वर पाटील इंगळे शिक्षक, कर्ण – समाधान बिडवे,व्यास – सुभाष पाटील इंगळे… … रामायण सोंगाची नाव …. श्रावणबाळ – श्री शालिकराम पाटील इंगळे, दशरथ राजा – ज्ञानेश्र्वर पाटील इंगळे माजी चेअरमन,कैकई – विजय पाटील कोरडे, सुमित्रा – श्री सुनिल पाटील इंगळे, कौशल्या – श्री शेनफड पाटील इंगळे, मंथना दाशी – अंकुश पाटील इंगळे,राम – श्री दत्ता पाटील कोरडे ग्राम पंचायत सदस्य, लक्ष्मण – श्री भगवान पाटील इंगळे उप सरपंच, सीता – श्री विजय पाटील कोरडे, रावण – श्री सुनिल शिवाजी इंगळे,जटाऊ – श्री कृष्णा पाटील इंगळे,मरिषमामा – श्री रामदास बाबा इंगळे ,शूर्पनखा डाकीण – श्री पंजाबराव पाटील कोरडे.. सजावट -श्री रामदास पांडुरंग कोरडे, श्री दादामामा पाटील कोरडे, श्री शालिकराम पाटील इंगळे. तसेच रात्री वाघे मंडळ कला पथक असे अनेक संकृतिक कार्यक्रम असतात.

Previous articleभाजपा जिल्हा कार्यालयात स्थापना दिवस उत्साहात साजरा
Next articleमोतीगव्हाण येथे शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद विकोपाला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here