Home जालना राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांनी औद्योगिक आस्थापनांना भेटी देत...

राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांनी औद्योगिक आस्थापनांना भेटी देत जाणून घेतल्या महिला कामगारांच्या समस्या

51
0

आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय

IMG-20230712-WA0071.jpg

 

राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांनी

औद्योगिक आस्थापनांना भेटी देत जाणून घेतल्या महिला कामगारांच्या समस्या

जालना दिलीप बोंडे युवा मराठा न्युज नेटवर्क

15 दिवसाच्या आत महिला तक्रार निवारण समिती गठीत करुन अहवाल सादर करण्याची सुचना

 

जालना  (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांनी एल.जी.बी.कंपनी, महिको संशोधन केंद्र आणि एनआरबी बेअरींग कंपनी या औद्योगिक आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देत तेथे काम करत असलेल्या महिला कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक आस्थापनेत महिला तक्रार निवारण समिती असणे बंधनकारक आहे. आस्थापनाअंतर्गत महिला तक्रार निवारण समित्या गठीत केल्या नसल्यास येणाऱ्या 15 दिवसाच्या आत समिती गठीत करुन अहवाल सादर करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा सुचना राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांनी दिल्या.

बुधवार दि.12 जुलै 2023 रोजीच्या भेटी दरम्यानच्या दौऱ्यात जिल्हा समन्वयक ॲड. पी. जी. गवारे, औद्योगिक उपसंचालक डी. आर. शिरोडकर, जिल्हा कामगार अधिकारी अमोल जाधव, डी.एस.खरे यांच्यासह  संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. चव्हाण म्हणाल्या की, महिला कामगारांना शासनाने विविध सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी नियमावली तयार केलेली आहे. या नियमावलीचे पालन सर्व खाजगी आस्थापनांनी करणे गरजेचे आहे. कारखान्यात महिला कामगारांची संख्या जास्त असल्यास अंतर्गत तक्रार निवारण समिती, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन तसेच ते वापरलेले पॅड नष्ट करण्याची मशीन, पाळणाघर तसेच स्वतंत्र शौचालयासह आराम खोली असणे बंधनकारक आहे. असे सांगून कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, गरोदरपणातील रजा यातील येणाऱ्या अडचणी समजून घेवु

Previous articleरिसनगाव येथील आत्महत्याग्रस्त हाबगुंडे परिवारास टायगर ग्रुपची सांत्वन भेट व आर्थिक मदत
Next articleव-हाणे ग्रामपंचायतीचा अंदाधुंदी कारभार; सुवर्णा सांळुखेंचा आणखी एक कारनामा चव्हाटयावर..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here