Home Breaking News व-हाणे ग्रामपंचायतीचा अंदाधुंदी कारभार; सुवर्णा सांळुखेंचा आणखी एक कारनामा चव्हाटयावर..!

व-हाणे ग्रामपंचायतीचा अंदाधुंदी कारभार; सुवर्णा सांळुखेंचा आणखी एक कारनामा चव्हाटयावर..!

201
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Screenshot_20230714-072958_Gallery.jpg

व-हाणे ग्रामपंचायतीचा अंदाधुंदी कारभार; सुवर्णा सांळुखेंचा आणखी एक कारनामा चव्हाटयावर..!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव– ग्रामपंचायतीने कुठल्याही आयोजीत केलेल्या ग्रामसभेला कोरम संख्या पुर्ण असल्याशिवाय ग्रामसभा व्यशस्वी होत नाही.पण बोगस व खोटी कामे करण्यात माहिर असलेल्या व-हाणे ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांचा आणखी एक कारनामा चव्हाटयावर आला असून, त्यामुळे सरपंच पदाच्या अस्तित्वालाच आता धोका निर्माण झाला आहे.
याबाबत प्राप्त सविस्तर वृत असे की,व-हाणे ग्रामपंचायतीने दिनांक ४ आँक्टोबर २०२१ रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांची संख्या १०५ दाखविलेली असली तरी या ग्रामसभेला प्रत्यक्षात ग्रामपंचायतीचे एकूण पाच सदस्य गैरहजर होते आणि गैरहजर असलेल्या सदस्यांनाच ग्रामसभेतील ठराव मंजूर करताना सुचक म्हणून दाखविण्यात आले.त्याशिवाय ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांना सहया करुन ग्राह्य धरता येत नसतानाही सदरच्या ग्रामसभेत कर्मचाऱ्यांच्या देखील सहया घेऊन ग्रामसभा व्यशस्वी झाल्याचा खोटा व लबाडीचा दिखावा करण्यात आला.प्रत्यक्षात ४ आँक्टोबर २०२१ च्या या ग्रामसभेला फक्त ९९ लोक हजर असताना या ग्रामसभेत मंजूर केलेले वेगवेगळे ठराव आणि त्याव्दारे शासनाकडून लाटण्यात आलेला पैसा हा संबधिताकडून वसुल करण्यात येऊन झालेली बोगस ग्रामसभा रद्द करण्यात यावी आता अशी मागणी पुढे येत असून,व-हाणे ग्रामपंचायतीने सगळ्याच ग्रामसभा खोटया व बनावट केलेल्या असल्याची शंका यानिमिताने उपस्थित होत असल्यामुळे सगळ्याच ग्रामसभा रद्द करुन,शासनाची दिशाभूल करुन फसवणूक करणाऱ्या ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेवर गुन्हा दाखल करण्या सोबतच सरपंचाने पदाचा गैरवापर केल्यामुळे त्यांनाही अपात्र करण्यात यावे,या मागणीसाठी आता युवा मराठा महासंघाचा नवा लढा लवकरच सुरु केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here