Home नांदेड मुखेड येथे जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मुखेड विधानसभा मतदारसंघाची प्रशिक्षण...

मुखेड येथे जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मुखेड विधानसभा मतदारसंघाची प्रशिक्षण व आढावा बैठक संपन्न.

210

आशाताई बच्छाव

IMG-20230715-WA0005.jpg

मुखेड येथे जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मुखेड विधानसभा मतदारसंघाची प्रशिक्षण व आढावा बैठक संपन्न.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

 

आज दिनांक 14 जुलै 2023 रोजी मा.श्री अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली 91 मुखेड विधानसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs)व पर्यवेक्षकिय अधिकारी यांना प्रशिक्षण व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना नव मतदारांची नोंदणी बाबत, प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देण्याबाबत, मतदार वगळणी स्थलांतर याविषयी सविस्तर माहिती दिली. पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे मतदार यादी पुनरिक्षण व शुद्धीकरण बाबत श्री कुलदिप जंगम मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधीकारी देगलुर यांनी माहिती दिली. तसेच बी एल ओ ॲप बाबत पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे माहिती राजेश जाधव तहसीलदार मुखेड व बबलु शेख ऑपरेटर यांनी दिली. मा जिल्हाधिकारी यांनी महोदय यांनी मतदार नोंदणी व वगळणी बाबत काय काळजी घ्यावी याचेही सविस्तर प्रशिक्षण blo यांना देण्यात आले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसुल सहायक श्री भुरे यांनी केले. या प्रशिक्षण वर्गामध्ये श्री राठोड गट विकास अधिकारी ,श्री बोथीकर..निवडणूक नायव तहसीलदार..मुख्याधिकारी श्री पाटे साहेब.. श्री पांडुरंग गंगनार नायब तहसीलदार ..मंडळ अधिकारी ,तलाठी सर्व बिएलओ उपस्थित होते.

Previous articleव-हाणे ग्रामपंचायतीचा अंदाधुंदी कारभार; सुवर्णा सांळुखेंचा आणखी एक कारनामा चव्हाटयावर..!
Next articleव-हाणे प्रकरणात “आंधळ दळतंय कुत्र पीठ खातंय” प्रशासनाची मात्र डोळेझाक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.