Home Breaking News व-हाणे प्रकरणात “आंधळ दळतंय कुत्र पीठ खातंय” प्रशासनाची मात्र डोळेझाक

व-हाणे प्रकरणात “आंधळ दळतंय कुत्र पीठ खातंय” प्रशासनाची मात्र डोळेझाक

128
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Screenshot_20230715-175026_Facebook.jpg

व-हाणे प्रकरणात “आंधळ दळतंय कुत्र पीठ खातंय” प्रशासनाची मात्र डोळेझाक
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव-नाशिकच्या मालेगांव जवळील व-हाणे ग्रामपंचायतीचा अंदाधुंद कारभार म्हणजे “आंधळ दळत अन कुत्र पीठ खातंय” अशा स्वरुपाचा दिवसाढवळ्या शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचा हा गंभीर प्रकार प्रशासनाला स्पष्ट दिसत असतानाही त्याकडे हेतूत दुर्लक्ष करुन डोळेझाक केली जात असल्याचा प्रकार संतापजनक आहे.
व-हाणे ग्रामपंचायतीत नऊ सदस्यांची कार्यकारीणी असताना दिनांक ४ आँक्टोबर २०२१ ला घेतलेल्या ग्रामसभेत नऊ पैकी पाच सदस्य गैरहजर आणि त्यांनाच सुचक म्हणून प्रोसेडींग बुकात दाखवून खोटे नाटे ठराव ग्रामसभेत मंजुर करुन घेतलेत.खरे तर या ग्रामसभेला अवघे ९९ लोक हजर असताना ही ग्रामसभा कोणत्या आधारावर व नियमाने घेण्यात आली,हा प्रश्न उपस्थित होत असतानाच केलेल्या ठरावाव्दारे शासनाकडून किती निधी कोणत्या योजनेसाठी कसा लाटला व तो कुठे खर्च झाला.यामध्ये झालेल्या मोठया गैरव्यवहाराची चौकशी करण्याबरोबरच या ग्रामसभेच्या निमिताने सगळ्याच ग्रामसभा बोगस व बनावट झाल्याचा संशय निर्माण होण्याबरोबर शंका घेण्यास वाव मिळत आहे.शासनाचे सगळेच नियम धाब्यावर बसवून मनमानी व हेकेखोर हट्टीपणाने एकहाती कारभार करणाऱ्या ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांचेवर गुन्हा दाखल करुन तडकाफडकी निलंबित करण्याच्या मागणीसोबतच सरपंच तथा ग्रामसभेच्या अध्यक्षाने पदाचा गैरवापर केला या कारणामुळे अपात्रेच्या मागणीसाठी सोमवारी नाशिक येथे महासंघाच्या कायदेशीर सल्लागार अँड नागरे यांच्या वतीने याचिका दाखल केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here