Home बुलढाणा “युवा मराठा”चे राज्यस्तरीय अधिवेशन शेगांवात याच महिना अखेरीस पार पडणार

“युवा मराठा”चे राज्यस्तरीय अधिवेशन शेगांवात याच महिना अखेरीस पार पडणार

212
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230717-074226_Google.jpg

“युवा मराठा”चे राज्यस्तरीय अधिवेशन शेगांवात याच महिना अखेरीस पार पडणार
(संजय पन्हाळकर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
मोताळा– युवा मराठा महासंघ तथा युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनलचे राज्यस्तरीय अधिवेशन याच महिना अखेरीस शेगांव जि.बुलढाणा येथे संत गजानन महाराजांच्या पावन भुमीत पार पडणार आहे.
युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनल सह युवा मराठा महासंघ संपूर्ण महाराष्ट्रातल्या पंचवीस जिल्ह्यात कार्यरत असून,विविध प्रश्नांवर रणणिती तयार करणे,प्रतिनिधी पदाधिकारीची या मेळाव्यातून एकमेकांशी सुसवांद साधणे, त्याशिवाय प्रतिनिधी पदाधिका-यांचा सत्कार करुन सन्मान वाढविणे,महासंघाचे कार्य सर्वदूर कसे पोहचेल यासाठी मार्गदर्शन करणे आदी व इतरही विषयावर हे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले जात आहे.या अधिवेशनाच्या व्यशस्वीतेसाठी युवा मराठाचे विदर्भातील स्वप्नील देशमुख, ज्ञानेश्वर पाटील दांदळे,किरण पाटील,संजय पन्हाळकर,महेंद्र देशमुख शेगांव,सतिश लाहुळकर,शाहनवाज़ शाह लक्ष्मीकांत यादव अकोला,गोपाल तिवारी,रितेश गाडेकर, निखील धुत वाशिम,पी.एन.देशमुख अमरावती,मोहन देशमुख नागपूर ,सुरज गुंडमवार गडचिरोली हे प्रयत्नशील असून,युवा मराठाचे हे पहिलेच अधिवेशन असून, यापुर्वी महासंघाचे मेळावे ठेंगोडा (नाशिक),कावी (परभणी), परेल ( मुंबई ), साल्हेर(सटाणा) येथे पार पडलेले आहेत.तर या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधीची उपस्थिती असणार आहे.या अधिवेशनासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय अधिकारी हेच प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रीत केले जाणार आहेत.तर या अधिवेशनासाठी शेगांव येथील संत गजानन महाराज संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

Previous articleव-हाणे प्रकरणात “आंधळ दळतंय कुत्र पीठ खातंय” प्रशासनाची मात्र डोळेझाक
Next articleमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षेत कु. अनुजा वडजे ची निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here