Home Breaking News 🛑 विजयदुर्गची पडझड रोखण्यासाठी आजची बैठक सकारात्मक…..! शिवभक्तंच्या वतीने मंत्रीमहोदयांचे आभार 🛑

🛑 विजयदुर्गची पडझड रोखण्यासाठी आजची बैठक सकारात्मक…..! शिवभक्तंच्या वतीने मंत्रीमहोदयांचे आभार 🛑

104
0

🛑 विजयदुर्गची पडझड रोखण्यासाठी आजची बैठक सकारात्मक…..! शिवभक्तंच्या वतीने मंत्रीमहोदयांचे आभार 🛑
✍️कोल्हापूर:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कोल्हापूर :⭕विजय दुर्ग ढासळतोय, त्याची समुद्राच्या लाटांनी झीज होत आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेले जवळपास सर्वच गडकिल्ले आज अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याची खंत काही दिवसांपूर्वीच फेसबुक पोस्ट लिहून संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती.

त्यानंतर आज संभाजीराजे यांनी थेट केंद्रिय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेत विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली.

विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात यासाठी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची भेट घेतली. यावेळी दुरुस्ती करण्यासाठी लेखी पत्र सुध्दा दिले, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.

बैठकीमध्ये स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्यांचे महत्व सांगून हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी मागणी केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. तसंच मंत्री पटेल यांनी देखील तातडीने केंद्रीय पुरातत्व खात्याला इस्टीमेट तयार करण्याचे आदेश दिले, ते म्हणाले.

पावसाळा संपताच पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आवश्यक आहेत त्या सर्व कागदोपत्री परवानग्या आठवडाभरात पूर्ण झाल्या पाहिजेत अशी सूचना सुद्धा त्यांनी केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

आजची बैठक अत्यंत सकारात्मक झाली त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे सर्व शिवभक्तांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो.

त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य आणि शिवभक्तांच्या भावनांचा आदर करीत तात्काळ निर्णय घेतले, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं…..⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here