• Home
  • 🛑 ” काँग्रेस – राष्ट्रवादी ” च्या दबावामुळे….! शिवसेनेने हिंदुत्व सोडलं….! 🛑

🛑 ” काँग्रेस – राष्ट्रवादी ” च्या दबावामुळे….! शिवसेनेने हिंदुत्व सोडलं….! 🛑

🛑 ” काँग्रेस – राष्ट्रवादी ” च्या दबावामुळे….! शिवसेनेने हिंदुत्व सोडलं….! 🛑
✍️औरंगाबाद:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद :⭕ अयोध्येत प्रभू राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत शिलान्यास करुन भूमीपूजन सोहळा संपन्न झाला.

दरम्यान देशभरात हा सोहळा प्रभू श्रीरामाची आरती करत, रामनाम पठण करत तसेच भजन कीर्तन करत साजरा केला.

दरम्यान राज्यातील भाजप तसेच मनसे कार्यकर्त्यांना काल कोणताही जल्लोष, फटाकेबाजी करण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली….

ठाकरे सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी समजते , परंतु सरकार हिंदुत्ववादी राहिले नाही, श्रीरामाचे पूजन करण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला याचा आम्ही निषेध करतो….

” काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ” दबावामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे, श्रीरामाच्या फोटोसह आम्हाला अटक केली आहे, रामाचे पूजन झालेच पाहिजे, मंदिराचं पूजन धुमधडाक्यात झालं पाहिजे, आज तुम्ही आम्हाला थांबवलं, पण हिंदू नेहमी पूजन करणारच.

रामाची पूजा करण्यासाठी आम्हाला कोणी थांबवू शकत नाही असे मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी सांगितले.

आज अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होता त्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्यातर्फे धर्मवीर संभाजीराजे चौक हडको येथे श्रीराम पूजन व प्रसाद वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात येत होता.

परंतु अचानक पोलिसांनी पूजा न करु देताच श्रीरामांच्या प्रतिमेसह सुहास दशरथे व सर्व कार्यकर्त्यांना अटक केली. मराठवाडा मुक्तीनंतर पहिल्यांदाच पूजा व प्रसादाला विरोध करणाऱ्या तिघाडी सरकारच्या रुपात रझाकारीचा अनुभव आज संभाजीनगरने घेतला असल्याची भावना यावेळी भाजपा व मनसेच्या कार्यकर्त्यानी व्यक्त केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर, बापू घडमोडे यांनी सुहास दशरथे व कार्यकर्त्यांची भेट घेतली सदिच्छा भेट दिली….⭕

anews Banner

Leave A Comment