• Home
  • सटाणा तालुक्यात प्रेमीयुगलाची आत्महत्या”एक दुजे के लिये”चा प्रकार

सटाणा तालुक्यात प्रेमीयुगलाची आत्महत्या”एक दुजे के लिये”चा प्रकार

*सटाणा तालुक्यात प्रेमीयुगलाची आत्महत्या”एक दुजे के लिये”चा प्रकार*
डांगसौंदाणे,(अशोक बहिरम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातल्या सावरपाडे गावाच्या शिवारात एका प्रेमीयुगलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे,
याबाबत सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की,रवींद्र पोपट पवार वय २२वर्ष रा.पठावे दिगर,आणि सावरपाडा येथील पुजा बंडू गांगुर्ड वय १८वर्ष यांचे प्रेमसंबध शालेय जीवनापासून फुलले बहरत होते चालले होते.मात्र त्यांच्या या प्रेमात नेमके काय विघ्न आले हे अखेरपर्यत कळलेच नाही.आणि रवींद्र व पुजाने काल रविवारी सकाळी सावरपाडे गावाच्या शिवारातील गट नं.१०२ मध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली,सटाणा पोलिसांनी दोघांचेही मृतदेह उतरीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात पुढील सोपस्कारासाठी मृतदेह दिले आहेत.अशा पध्दतीने दोघा प्रेमीयुगलाच्या आत्महत्येने “एक दुजे के लिये”चित्रपटातील वासू आणि सपनाच्या प्रेमकहाणीचा इतिहास या निमित या भागात चर्चिला जात आहे

anews Banner

Leave A Comment