• Home
  • राज्याचे बांधकाम मंत्री व कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण पुढील उपचारासाठी नांदेडहुन मुंबईला रवाना

राज्याचे बांधकाम मंत्री व कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण पुढील उपचारासाठी नांदेडहुन मुंबईला रवाना

*राज्याचे बांधकाम मंत्री व कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण पुढील उपचारासाठी नांदेडहुन मुंबईला रवाना*
*नांदेड, २५ ; राजेश एन भांगे*
माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिर असली, तरी पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर इंग्रजी, हिंदी वृत्तवाहिन्या व वृत्तपत्राच्या दाखल्यानुसार अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाण हे पंधरा दिवस मुंबईत होते. त्यानंतर ते तीन ते चार दिवसांपूर्वी नांदेड येथे दाखल झाल्यापासून ते घरात क्वॉरंटाईन झाले होते. रविवारी रात्री त्यांना त्रास जाणवू लागल्यामुळे रविवारी सायंकाळी त्यांना एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. उपचारामधून बाहेर पडल्यानंतर अशी कबुली त्यांनीच दिली होती. तर माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे यांना ही कोरेानाची लागण झाल्यामुळे मुंबईत यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर महाराष्ट्रातील दोन आजी व माजी मंत्र्यास कोरेानाची लागण झाल्याची घटना ताजी असताना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त मराठी, हिंदी व इंग्रजी वाहिन्यांनी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे . तर आतापर्यंत अशोक चव्हाण यांच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते . आता पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलविण्यात येत आहे. तर अशोक चव्हाण यांना एका संसर्गाचा त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती वार्‍यासारखी परसली. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या हजारो चाहते व विरोधी पक्षामधील नेत्यांनी सुद्धा चव्हाण हे या संसर्गातून लवकर बरे व्हावे, यासाठी सदिच्छा व्यक्त करणार्‍या पोस्ट सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्या आहेत. व अशोक चव्हाण यांच्या प्रकृतीस्वस्थासाठी जिल्हाभरातून सदिच्छा व्यक्य होत आहेत.

anews Banner

Leave A Comment