Home नांदेड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षेत कु. अनुजा वडजे ची निवड.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षेत कु. अनुजा वडजे ची निवड.

213
0

आशाताई बच्छाव

IMG-20230719-WA0002.jpg

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षेत कु. अनुजा वडजे ची निवड.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

मुखेड – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षेत मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथील रहिवासी असलेली कु. अनुजा ज्ञानेश्वर पाटील वडजे हि पहिल्याच परीक्षेत यशस्वी होऊन मंत्रालयात वरिष्ठ लिपिक म्हणून तिची निवड झाली.

मुळातच अनुजा हि खुप जिद्दी चिकाटी व अभ्यासु प्रवृत्तीची विद्यार्थीनी असल्याने ध्येय प्राप्त करू अनुजाचे प्राथमिक शिक्षण उंद्री (प.दे.)येथे तर माध्यमिक शिक्षण देगलुर महाविद्यालय देगलूर तर पदवी धर्माबाद येथे पुर्ण करुन आईवडील यांच्या अथक परिश्रमाने तिने MPSC परीक्षेत यश संपादित केले.याचे पुर्ण श्रेय आईवडिल व मोठे दोन बहिणी,व गुरुजनांना जाते. अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.मध्यम परिस्थितीत शिक्षण घेऊन ती आज मंत्रालयात वरिष्ठ लिपिक म्हणून निवड झाल्याबद्दल गावातून व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here