Home उतर महाराष्ट्र Big breaking अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस खात्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आणणारी खळबळ...

Big breaking अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस खात्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आणणारी खळबळ जनक बातमी पोलिस उपनिरीक्षकाने केला बलात्कार!.

324
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230719-173120_WhatsApp.jpg

Big breaking
अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस खात्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आणणारी खळबळ जनक बातमी.

युवा मराठा न्युज फाऊंडेशन

प्रतिनिधी :- भरत नजन
राहुरीत रक्षकच झाला भक्षक! पोलीस वर्दीला फासला काळीमा!! पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल .राहुरी तालुक्यामध्ये खळबळ उडवून देणारी घटना . राहुरी,(भरत नजन तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही शपथ फक्त नावालाच उरली आहे .रक्षकच जर भक्षक होत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.राहुरीच्या पोलीस स्टेशन मधील पोलिस उपनिरिक्षक पदावर असलेले सज्जनसिंग न-हेडा यांच्यावर दवणगाव येथील तीस वर्षीय महिलेवर बलात्कार केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अहमदनगर जिल्ह्यात सध्या खळबळ उडवून देणाऱ्या घटना घडत आहेत .त्याचे पडसाद सध्या अधिवेशनातही गाजत आहे .त्यात भर म्हणून राहुरी तालुकाही मागे राहिला नाही .दवणगाव येथील एक तीस वर्षीय महिला तक्रार नोंदवण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशन येथे आली असता त्या महिलेला खाजगी माहिती विचारून तिच्या मोबाईलवर मेसेज करून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न राहुरीचे पोलिस उप निरीक्षक सज्जनसिंग न-हेडा यांनी केला आहे.या गोष्टीची तक्रार सदर महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केल्याने नाराज झालेल्या सज्जन न-हेडाने राहुरी स्टेशन रोडवर एका खाजगी खोलीत या महिलेवर बलात्कार केला .सदर महिलेने झालेली घटना उघड केल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून या महिलेने सहाय्यक पोलीस निरीक्षकावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणाबाबत राहुरीचे पोलीस निरीक्षक काय कारवाई करणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे .पोलीस स्टेशन मध्ये असा होणारा प्रकार चिंतेचा विषय ठरला आहे . महिलां बाबतीत जर अन्याय घडला आणि त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी गेल्यावर पोलीस त्यांच्याशी असे वर्तन करत असेल तर कुंपणच शेत खातंय ही म्हण वावगी ठरणार नाही .झालेल्या प्रकाराची गंभीर नोंद घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे .

Previous articleमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षेत कु. अनुजा वडजे ची निवड.
Next articleग्रामसेवक युनियनच्या बैठकीत धराधरी ते हाणामारीचा प्रकार… जिल्हाध्यक्ष वाकचौरेंचा हुकूमशाही कारभार!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here