Home Breaking News ग्रामसेवक युनियनच्या बैठकीत धराधरी ते हाणामारीचा प्रकार… जिल्हाध्यक्ष वाकचौरेंचा हुकूमशाही कारभार!

ग्रामसेवक युनियनच्या बैठकीत धराधरी ते हाणामारीचा प्रकार… जिल्हाध्यक्ष वाकचौरेंचा हुकूमशाही कारभार!

314
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

20230721_184746-BlendCollage.jpg

ग्रामसेवक युनियनच्या बैठकीत धराधरी ते हाणामारीचा प्रकार…
जिल्हाध्यक्ष वाकचौरेंचा हुकूमशाही कारभार!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव,- ग्रामसेवकांची युनियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डि.एन.ई.१३६ या संघटनेची आज मालेगांव पंचायत समितीच्या सभागृहात बैठक सुरु असतानाच ग्रामसेवक युनियनच्या भ्रष्टाचार मुद्द्यावर व इतरही प्रश्नांवर चर्चा सुरु असतनाच,ग्रामसेवक युनियनने पतसंस्थेसाठी मालेगांव शहरात सुमारे ८२ लाख रूपये खर्च करुन घेतलेल्या जागेवर तात्काळ बांधकाम सुरु करावे अशा स्वरुपाचे चर्चासत्र सुरू असतानाच जिल्हाध्यक्ष कैलास वाकचौरे हे हेकेखोर व हुकूमशाही पध्दतीने ग्रामसेवकांवर दबाव टाकत असल्याच्या कारणावरुन ग्रामसेवकांच्या या सभेत प्रकरण अक्षरशः धराधरी व धक्काबुकी पर्यत गेले.त्यावेळचे दृश्य बघण्यासाठी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.कर्मचाऱ्यांचे क्षणिक मनोरंजन झाले असले तरी मात्र ग्रामसेवकांनी एकमेकांना अश्शील व शिवराळ भाषेत शिवीगाळ करुन गटारी अमावस्या चक्क अधिक मासात साजरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here