Home Breaking News पोहाणे येथे गुप्तधनासाठी एका मुलाचा नरबळी महाअंनिस तर्फे पोलिस प्रशासनास निवेदन….

पोहाणे येथे गुप्तधनासाठी एका मुलाचा नरबळी महाअंनिस तर्फे पोलिस प्रशासनास निवेदन….

236

आशाताई बच्छाव

IMG-20230724-WA0002.jpg

पोहाणे येथे गुप्तधनासाठी एका मुलाचा नरबळी
महाअंनिस तर्फे पोलिस प्रशासनास निवेदन….           मालेगांव,(संदीप पवार प्रतिनिधी)-
मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथे अवघ्या नऊ वर्षाच्या मुलाचा गुप्तधनाच्या लालसेपोटी निर्घृणपणे नरबळी देण्यात आला. सदर घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गुन्ह्यातील आरोपींना वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेतील आरोपींना जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कडक शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,मालेगांव तर्फे वडनेर-खाकुर्डी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे माजी अध्यक्ष श्री.राजेंद्रभैय्या भोसले,श्रीसुभाषजी परदेशी,अध्यक्ष अनिल पाटील,जिल्हा कार्यवाह रविंद्र आहिरे,अभिजीत सोनपसारे व गौरव शेलार उपस्थित होते.
श्री.राजेंद्र भोसले यांनी गुन्ह्यातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी व पीडितांना न्याय मिळावा असे निवेदन केले.तसेच अशाच प्रकारच्या ईतर अंधश्रद्धा,मांडूळ तस्करी व कासव तस्करी यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी असे श्री.सुभाषजी परदेशी यांनी पोलिसांना सूचित केले.
पोहाणे येथे मयत मुलाच्या घरी जाऊन त्यांचे महाअंनिस तर्फे सांत्वन करण्यात आले.मयत झालेल्या मुलाच्या वडिलांनी “अशी दुःखद घटना पुन्हा कोणासोबत घडू नये” अशी भावना व्यक्त केली. पोहाणे गावातील सरपंच यांची भेट घेऊन प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल चर्चा करण्यात आली.

Previous articleग्रामसेवक युनियनच्या बैठकीत धराधरी ते हाणामारीचा प्रकार… जिल्हाध्यक्ष वाकचौरेंचा हुकूमशाही कारभार!
Next articleअजमिर सौंदाणे येथे वृक्ष दिंडी संपन्न     
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.