Home पुणे यवत, सासवड,जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कॅरी टेम्पो व इको गाड्यांचे महागडे सायलन्सर...

यवत, सासवड,जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कॅरी टेम्पो व इको गाड्यांचे महागडे सायलन्सर चोरी करणारे जेरबंद,४ गुन्हे उघडकीस एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

110
0

आशाताई बच्छाव

IMG-20221007-WA0027.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत नागणे
यवत, सासवड,जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कॅरी टेम्पो व इको गाड्यांचे महागडे सायलन्सर चोरी करणारे जेरबंद,४ गुन्हे उघडकीस एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
यवत गुन्हे शोध पथकाची कारवाई

दिनांक २१/०९/२०२२ रोजी मौजे यवत भुलेश्वर मार्केट समोर ता.दौंड जि. पुणे गावचे हद्दीत फिर्यादी नामे सतीश द्वारकादास लोंढे वय ४८ यांनी श्री भुलेश्वर गॅस एजन्सी समोर लावलेला त्यांचा मारुती सुझुकी कॅरी मॉडेलचा टेम्पो क्रमांक एम.एच. ४२ बी. एफ. ००५४ हिचा सायलेन्सर किंमत रुपये ५०,०००/- रु चा नट बोल्ट खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीचे इराद्याने चोरून नेले बाबत यवत पोलीस स्टेशन येथे दिनांक २१/०९/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने यवत परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे व रेकॉर्ड वरील आरोपी चेक करून सदरील फुटेजच्या आधारे त्यातील संशयित इसमाची माहिती घेण्यास सुरुवात केली असता दिनांक ०३/१०/२०२२ रोजी यवत गुन्हे शोध पथकास माहिती मिळाली की गणेशनगर धायरी येथील रोहित अडसूळ याने त्याचा साथीदार गौरव होगले याचे सोबत सदरचा सायलेन्सर चोरीचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाल्याने सदर पोलीस पथकाने गणेशनगर धायरी येथे जाऊन संशयित इसम नामे १)रोहित रंगनाथ अडसूळ वय १९ रा.गणेशनगर धायरी मुळ रा.तडवळ ता.जि.उस्मानाबाद यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा मित्र नामे गौरव होगले याचे सोबत केला असल्याची कबुली दिली व चोरून आणलेले सायलेन्सर हडपसर येथील भंगार व्यावसायिक २)तसब्बूर युसूफ मलिक सध्या रा.रामटेकडी मूळ रा. मुंडली ता.जि मेरठ राज्य उत्तर प्रदेश याला विकले असल्याचे सांगितले असता त्यासही सदर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपींनी यवत,सासवड,जेजुरी या परिसरातील एका मारुती सुझुकी कॅरी टेम्पोचा व तीन मारुती सुझुकी इको गाडीचे एकूण ४ गुन्हे केले असल्याचे सांगितले असून सदर गुन्हयातील दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांनी दिनांक १०/१०/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली असून आरोपींकडून खालीलप्रमाणे
१)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.७८१/२०२२भा. द.वि.कलम ३७९
२)सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं.३९२/२०२२भा. द.वि.कलम ३७९
३)सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं.३८३/२०२२भा. द.वि.कलम ३७९
४)जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं.३१०/२०२२भा. द.वि.कलम ३७९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस पोलीस हवालदार कृष्णा कानगुडे,निलेश कदम, गुरू गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव,गणेश कुतवळ सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन गायकवाड,पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केली आहे

Previous articleपोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन सेवेतून विश्वास निर्माण करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next articleपिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप यांना ‘समाज रत्न पुरस्कार’ प्रदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here