राजेंद्र पाटील राऊत
अकोला:(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चांद खा प्लॉट परिसरात विदेशी बनावटीचा देशी कट्टा घेऊन दहशत पसरविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्या जवळून एक देशी कट्टा व जिवंत काडतुस असा २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चांद खा प्लॉट परीसरात दोघेजण विदेशी बनावटीचा देशी कट्टा घेऊन तसेच त्यांच्याकडे एक जीवंत काडतूस असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून शेख इलियास उर्फ इल्लू शेख अयाज 21 रा. देशपांडे प्लॉट, शेख कासम शेख शेखजी 25 रा. चांद खा प्लॉट हे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून विदेशी बनावटीच देशी कट्टा व जिवंत काडतूस असा 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, सदाशिव सुडकर, अब्दुल माजिद, संदीप तवाडे, मोहम्मद रफी, एजाज अहमद, सुशील खंडारे, सतिष गुप्ता, रोशन पटले, अनिल राठोड, प्रवीण कश्यप यांनी केली.माहिती सुत्रा वरुण