Home रत्नागिरी पोलीस पथकाच्यावतीने देशभक्तीपर गीतांचे गायन सावर्डे विद्यालयात लक्षवेधी उपक्रम

पोलीस पथकाच्यावतीने देशभक्तीपर गीतांचे गायन सावर्डे विद्यालयात लक्षवेधी उपक्रम

110

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0039.jpg

पोलीस पथकाच्यावतीने देशभक्तीपर गीतांचे गायन सावर्डे विद्यालयात लक्षवेधी उपक्रम                        रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्ताने घराघरात प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत भारताच्या जाज्वल इतिहासाचे स्मरण व्हावे, या उद्देशाने भारतातील विविध विभागांच्यावतीने उपक्रम राबविले जात आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण पणाला लावणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना सलाम करण्यासाठी अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रत्नागिरी पोलीस दलाचे पोलीस बँड पथकाच्यावतीने देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम सुरू आहे.

अतिशय उत्कृष्ट नियोजन व राष्ट्रगीत, ए मेरे वतन के लोगो, संदेशे आते है, कर्मा, वंदे मातरम इत्यादी विविध अंगी गीतांचे गायन करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती प्रेरित करण्याचा अत्यंत सुदर उपक्रम राबविला आहे.