• Home
  • 🛑 पिंपरीचे आण्णासाहेब मगर क्रीडांगण तसंच महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कोविड केंद्राच्या कामाची पाहणी 🛑

🛑 पिंपरीचे आण्णासाहेब मगर क्रीडांगण तसंच महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कोविड केंद्राच्या कामाची पाहणी 🛑

🛑 पिंपरीचे आण्णासाहेब मगर क्रीडांगण तसंच
महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कोविड केंद्राच्या कामाची पाहणी 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पिंपरी :⭕आण्णासाहेब मगर क्रीडांगण, शिवाजी नगरमधील
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) प्रांगण तसंच महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कोविड केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. ‘जम्‍बो कोविड केंद्रा’चे काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

‘जम्बो कोविड केंद्रा’ची उभारणी करताना दर्जेदार काम करण्यावर भर असला पाहिजे. कोरोना संकट काळात नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सर्व सुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे.

गारपीट, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच रुग्णालय उभारणीचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचना, ऑक्सिजनयुक्त, आयसीयू खाटा, कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर), ऑक्सिजन पुरवठा, २ खाटांमधील सुरक्षित अंतर, कोरोनाबाधित रुग्णांवर करण्यात येणाऱ्या चाचण्या, विद्युतीकरण, वाहनतळ इत्यादी बाबींची माहिती घेतली. यासह शौचालय, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, डॉक्टर व परिचारिका यांच्या राहण्याची व भोजनाची सोय, खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात कोविड केंद्राच्या आजूबाजूने साठणारं पाणी आणि त्‍याचा निचरा करण्याची व्यवस्था आदी बाबींसह पायाभूत सुविधांची माहिती घेतली….⭕

anews Banner

कोल्हापूरच्या आमदारांनी गृहमंत्र्यांशी घेतली आढावा बैठक. कोल्हापूरचे पालकमंत्री मा.सतेज पाटील यांचे पुतणे नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार ॠतूराज पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री ना.देशमुख यांच्याबरोबर आढावा बैठक घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सविस्तर प्रश्न मांडले. १) कोल्हापुरात लवकरात लवकर आयुक्तालय व्हावे? मा. गृहमंत्री अनिल देशमुख : कोरोना महामारीनंतर कोल्हापुरात आयुक्तालयाच्या मागणीबाबत शासन सर्वांशी चर्चा करून निर्णय घेईल. २) सध्या दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 आहे. ती लोकांना गैरसोयीची आहे. ही वेळ बदलून सकाळी 9 ते सायंकाळी 7 करण्यात यावी? मा. गृहमंत्री अनिल देशमुख : दुकानांच्या वेळेबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने लोकांची सोय लक्षात घेऊन यावर चर्चा करून निर्णय घ्यावा. अशा पद्धतीने मा.आमदार ॠतूराज पाटील जनतेच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी राज्याचे गृहमंत्री ना.देशमुख यांनी आ.पाटील यांना समाधानकारक उत्तरे् दिली. कोल्हापुर प्रतिनिधी. मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज.

By Yuva Maratha

Leave A Comment