Home नांदेड अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यात हाहाकार.

अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यात हाहाकार.

199

आशाताई बच्छाव

IMG-20220715-WA0012.jpg

अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यात हाहाकार.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मागील १० दिवसांपासून संततधार पावसामुळे अतिवृष्टी नदीतील पाण्याचा पातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली असून हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.या नुकसानीची व पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी सौ.सोम्या शर्मा व तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी शिरुर (दबडे), सोनपेठवाडी, कुंद्राळा कॅम्प हे पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.मुखेड शहरांसहअनेक गावाना प्रत्यक्ष भेट घेऊन सुचना दिल्या आहेत.मुखेड तालुक्यातील प्रत्येक गावाच्या तलाठी यांना प्रस्तुत अहवाल देण्याचे आदेश दिला आहे.मुखेड तालुक्यातील आतापर्यंत कुठेही काही घटना घडली नाही.प्रशासन पुर्ण बाबींवर लक्ष ठेवून गाव भेटी करत आहे.यात नायब तहसीलदार महेश हंडे तलाठी गोपिनाथ कल्याणकर,उदय मिसाळे,गजानन पडोळे,ज्ञानेश्वर रातोळीकर,लक्ष्मण गोधणे,प्रविण पवार,रवि कापसे,सतिश देशमुख,एम.जी.जमदाडे,प्रकाश तोटेवाड,
एम.बी.श्रीरामे,बळी कदम,उषा देवतळे,एस.एम.कोनाळे,जगन्नाथ वारकरी,एन.एस.भिसे,गंगाधर मेहत्रे,देविदास भुरेवार,एस.डी.लोकरे,आनंद करडे व मंडळ अधिकारी यल्लावार हे सहाय्यक जिल्हाधिकारी सौ.सौम्या शर्मा व तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या सोबत कर्तव्यावर दक्ष आहेत.भेटी दिलेल्या गावची नावे सलगरा (खु), सलगरा (बु),बेटमोगरा, चांडोळा, मुखेड शहर ,उच्चा, शिरुर दबडे, सोनपेठवाडी,कुंद्राळा कॅम्प, येवती, बा-हाळी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात पेशकार गुलाब शेख हे कार्यरत आहेत.भेट देवून पूर परिस्थितीच्या आढावा घेतला.तसेच गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला.वसुर तांडा येथे पाण्यामध्ये गाय वाहून गेल्याने मृत पावली आहे.

Previous articleलखमापूर जवळील पूलातील गाळ काढून रस्ता वाहतुकीसाठी केला मोकळा.
Next articleहिसवळ खुर्द येथे पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.