Home नाशिक हिसवळ खुर्द येथे पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

हिसवळ खुर्द येथे पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20220715-WA0015.jpg

हिसवळ खुर्द येथे पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन
———नांदगाव, प्रतिनिधी अनिल धामणे——-
. गिरणा धरणावरील ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या सदोष यंत्रणेमुळे हिसवळ खुर्द हिसवळ बु. ग्रामस्थांना पावसाळ्यात पिण्यासाठी पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक वेळा पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नांदगाव मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन केले याचवेळी ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेतुन सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ढवळे साहेब पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कापसे साहेब. नांदगावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरवाडकर साहेब,पो. बोगीर साहेब, पो. सोनवणे साहेब,हिसवळ खुर्द चे सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, सदस्य- नानासाहेब आहेर, सुदाम आहेर बंडूकाका आहेर, लखन आहेर, शांताराम लोखंडे, संदीप कदम, संदीप आहेर, माजी सरपंच विजय आहेर, माझे सरपंच मोहन दादा आहेर, माजी सरपंच संजय बापू आहेर,हिसवळ बु. सरपंच बाळू नाना बेंडके, रवींद्र देशमुख, श्रावण भालेराव, राजेंद्र करवर यासह, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचीही गाडी ग्रामस्थांनी अडवली व आपले संपूर्ण गर्हाणे त्यांच्यासमोर मांडले यातून, अधिकारी लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढण्याचेही,लीना बनसोड यांनी ग्रामस्थांना सांगितले.

Previous articleअतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यात हाहाकार.
Next articleबिहारच्या आरतीच्या नशिबी असा कसा वनवास आला;लग्नाअगोदरच विधवा म्हणून जगण्याचा डाग लागला!(सच्च्या प्रेमाची दुःखभरी सत्यकथा)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here