शेळगाव गौरी येथील गुरुवर्य स्व. मुरलीधर रामदासी (तेरकर महाराज ) यांचे अल्पशा आजाराने निधन..
नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव गौरी ता. नायगाव येथील गुरुवर्य वैकुंठवासी मुरलीधर रामदासी यांचे दिनांक 19 मे 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 75 वर्ष होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने गावावर व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे . पत्रकार सुनील रामदासी यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले, नात, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक 19 मे 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता शेळगाव गौरी ता. नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .शोकाकुल रामदासी परिवार व समस्त गावकरी मंडळी शेळगाव गौरी ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम शांती ओम भावपूर्ण श्रद्धांजली.