Home कोल्हापूर कमॉन इंडिया मित्र मंडळ व अमर वड्ड युवा मंच यांच्या वतीने गरजूंना...

कमॉन इंडिया मित्र मंडळ व अमर वड्ड युवा मंच यांच्या वतीने गरजूंना मोफत अंडी व रेशनचे किट वाटप

158
0

 

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.19/5/21 हेरले (ता. हातकणंगले) येथील कमॉन इंडिया मित्र मंडळ व अमर वड्ड युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमजुर व कष्टकरी कुटुंबांना मोफत अंडी व रेशनचे किट वाटप करण्यात आले.
कमॉन इंडिया मंडळ व अमर वड्ड युवामंच यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून रोजंदारीवर काम करणा-या कुटुंबांना लॉकडाऊनच्या काळात एक मदतीचा हात या उद्देशाने एक किलो गोडे तेल, एक किलो साखर, अर्धा किलो प्रमाणे तीन डाळी, कांदे, बटाटे आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. पाचशे कटुंबांना या ग्रुपच्या वतीने मदत दिली जात आहे. या त्यांच्या सामाजिक मदत कार्याच्या उपक्रमामुळे त्यांचे परिसरातून कौतूक होत आहे.
या सामाजिक कार्यात अमर वड्ड, रंजीत इनामदार, सचिन जाधव, सुकुमार लोखंडे, विजय वड्ड ,मोहन जाधव, मनोहर कलकुटकी व मंडळाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.

Previous articleसोलापूर जिल्ह्यातील हक्काचे पाणी वाटप यासाठी आंदोलन
Next articleशेळगाव गौरी येथील गुरुवर्य स्व. मुरलीधर रामदासी (तेरकर महाराज ) यांचे अल्पशा आजाराने निधन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here