Home पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातील हक्काचे पाणी वाटप यासाठी आंदोलन

सोलापूर जिल्ह्यातील हक्काचे पाणी वाटप यासाठी आंदोलन

192
0

राजेंद्र पाटील राऊत

सोलापूर जिल्ह्यातील हक्काचे पाणी वाटप यासाठी आंदोलन
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप

सोलापूर जिल्ह्यातील हक्काचे पाणी जिल्ह्यासाठी परत मिळवण्यासाठी उजनी येथे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना, प्रहा र संघटना,रयत क्रांती संघटना,संभाजी बिग्रेड,बळीराजा शेतकरी संघटना या सर्व शेतकरी संघटनाचे 4/5 पासुन बेमुदत धरणे आंदोलन चालु आहे या ठिकाणी माढा विधानसभा मतदारसंघाचे व आमचे नेते मा संजय बाबा कोकाटे यांनी एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने व आपल्या सोलापूर जिल्हा व माढा तालुक्याच्या हक्काचे 5 टी.एम.सी पाणी वाचवण्यासाठी चालु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत अल्पोउपहार दिला.

आंदोलन करते यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे…

1) उजनी धरणाचे बेकायदेशीर रित्या जे 5 टि.एम.सी पाणी इंदापुरला नेहण्यासाठी शासनाने मंजुर केले आहे ते त्वरीत रद्द करावे.

2)मा.पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना खरेच इंदापूरच्या शेतकऱ्यांची तळमळ असेल तर त्यांनी पुण्याच्या धरणाचे पाणी इंदापूरच्या शेतकऱ्यांना द्यावे.

3) बेकायदेशीररित्या शासनाने 5 टी.एम.सी पाण्याची मंजुरी दिली त्या संबंधित मंत्री महोदयावर गुन्हा दाखल करावा.

यावेळी, माढा विधानसभा मतदारसंघाचे व आमचे नेते संजय बाबा कोकाटे करमाळ्याचे माजी आमदार नारायण_आबा_पाटील, जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापु जगताप, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास अकोलेचे ग्रा.सदस्य विनोद पाटील,बेंबळेचे सरपंच विजय पवार,विठ्ठल आबा मस्के,प्रा.औदुंबर लोंढे,बबलु काळे,चांदजचे निवृत्ती तांबवे, मल्हारी गवळी,प्रंशात महाडिक,नारायण गायकवाड ,अमर पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleविजयवाडी गावात जनसेवा संघटनेचा जीवनावश्यक अश्या भाजीपाला वाटपाचा स्तुत्य उपक्रम
Next articleकमॉन इंडिया मित्र मंडळ व अमर वड्ड युवा मंच यांच्या वतीने गरजूंना मोफत अंडी व रेशनचे किट वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here