Home गुन्हेगारी बिहारच्या आरतीच्या नशिबी असा कसा वनवास आला;लग्नाअगोदरच विधवा म्हणून जगण्याचा डाग लागला!(सच्च्या...

बिहारच्या आरतीच्या नशिबी असा कसा वनवास आला;लग्नाअगोदरच विधवा म्हणून जगण्याचा डाग लागला!(सच्च्या प्रेमाची दुःखभरी सत्यकथा)

32
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220715-161451_Facebook.jpg

बिहारच्या आरतीच्या नशिबी असा कसा वनवास आला;लग्नाअगोदरच विधवा म्हणून जगण्याचा डाग लागला!(सच्च्या प्रेमाची दुःखभरी सत्यकथा)
प्रेम,प्यार,इश्क,मोहब्बत हि तर सगळी परमेश्वराची इबादत (देण) आहे.मग खरे प्रेम करणाऱ्याच्या जीवनात का म्हणून यातना भरलेल्या आहेत.प्रत्यक्ष राधेने श्रीकृष्णावर प्रेम केले,भगवान शंकरानी भिल्लणीच्या रुपावर प्रेम केले.असा हा प्रेमाचा इतिहास असला तरी,खरे प्रेम करणाऱ्या दोघा जीवाना हा समाज सुखाने का जगू देत नाही!आजकाल सोशल मिडीयावरील व्हाँटसअप,फेसबुक,इंस्टाग्रामवर लगेचच प्रेम निर्माण होते.मात्र त्यात बरेच फसवणूकीचे प्रकार तर एखादे दुसरे प्रेम व्यशस्वी झाल्याच्या घटना आपण बघतच असतो.प्रस्तुत कथा ही बिहारची असून,सध्या सोशल मिडीयावर खुपच चर्चत आहे.
नेमकी काय आहे,या घटनेची पार्श्वभूमी! बिहारमधील असलेली आरती यादव आणि छोटू यादव यांच्या प्रेमाला कुणाचे ग्रहण लागले की,एवढा माथेफिरु निर्णय घेऊन प्रेमी छोटू यादवला या जगातूनच कायमचे बाद केले.बिहारच्या अररिया जिल्ह्यात असलेल्या रानीगंज जवळील खरसाई गावातील ही घटना आहे.छोटू यादव आणि आरती यादव हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत होते.आरती यादव खरसाई गावची तर छोटू यादव शेजारील गावातला.दोघांचे रोजच फोनवर बोलणे व्हायचे,व्हाँटसअपवर चँटीग चालायची.मात्र दोघे एकाच समाजाचे असूनही शिवाय दोघेही सज्ञान असताना चांगला वाईट निर्णय घेण्याचा त्यांना कायद्याने अधिकार दिलेला असतानाही,ते प्रेमप्रकरण मात्र आरतीच्या घरच्यांना मान्य नव्हते.म्हणून आरतीच्या भावजयीने एक चाल खेळली,आणि त्यात छोटू यादव फसला.आरतीसोबत लग्नाची चर्चा करण्याच्या बहाण्याने छोटू यादवला खरसाई येथे भावजयीने बोलवून घेतले.मात्र तत्पूर्वी आरतीने छोटू यादवला फोन करुन सांगितले की,”बाबू तुम मत आना,यह लोग तुमे मार डालेंगे”मात्र छोटू यादवने आरतीचे काही न ऐकता खरसाई गावी गेला.शेवटी व्हायचे तेच झाले.छोटू यादवला अक्षरशः हाल हाल करुन मारण्यात आले.कित्येक तासापर्यत तर आरती छोटूच्या प्रेताला कवटाळून टाहो फोडत राहिली,रडत राहिली,विलाप करत राहिली.अखेर पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरतीच्या बापाला,भावाला,बहिण व मेहुण्यांना अटक केली.तर छोटू यादवचा अंत्यसंस्कार स्वतः आरतीने स्वहस्ते केला.आणि यापुढे फक्त छोटू यादवची विधवा म्हणून जगेन,व गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी लढा देईन असा निर्धार आरतीने केला.पण…हा प्रेमाचा दुश्मन जमाना..कधी खरे प्रेम करणाऱ्या युगलांना समजून घेणार आहे.परमेश्वराची देण असलेल्या प्रेमाला खोटया प्रतिष्ठेपायी कलंक लावणाऱ्या गुन्हेगारांना खर तर मोठयात मोठी सजा होणे क्रमप्राप्त ठरते,म्हणजे भविष्यात कुणी सहजासहजी प्रेमाकडे वाईट नजरेने बघण्याचे धाडस करणार नाही!
राजेंद्र पाटील-राऊत
मुख्य संपादक युवा मराठा

Previous articleहिसवळ खुर्द येथे पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन
Next articleब्रेकींग न्युज…! साल्हेरच्या किल्ल्यावरुन दोन जण पडल्याने एकाचा मृत्यू दुसऱ्याचा तपास सुरु!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here