• Home
  • देगलूर तालुक्यातील नागराळ, देगाव, किनी, व कावळगड्डा या चार गावातील ग्रामपंचायती बिनविरोध

देगलूर तालुक्यातील नागराळ, देगाव, किनी, व कावळगड्डा या चार गावातील ग्रामपंचायती बिनविरोध

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210104-WA0072.jpg

देगलूर तालुक्यातील नागराळ, देगाव, किनी, व कावळगड्डा या चार गावातील ग्रामपंचायती बिनविरोध देगलूर तालुक्यातील 85 ग्रामपंचायती निवडणूकापैकी नागराळ, देगाव, किनी, कावळगड्डा या चार गावातील ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात आल्या आहेत. चंद्रशेखर पाटील राजूरकर यांच्या मध्यस्थीने नागराळ हि ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतले होते. तर अँड.अंकुश देसाई व अशोक देसाई देगावकर या दोघांनी पुढाकार घेऊन देगाव (बु.)ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहे. तर सेवानिवृत्त अभियंता अशोक पाटील किनीकर यांच्या मध्यस्थीने किनी ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. तर देगलूर चे लोकप्रिय आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी कावळगड्डा येथील प्रकाश पाटील व विक्रांत पाटील यांना मध्यस्थी करून कावळगड्डा ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहे. या चार गावातील ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे गावातील व तालुक्यातील गावातील लोकांचे आभार मानत आहेत.   संजय कोकेंवार युवा मराठा न्युज नेटवर्क देगलूर नांदेड

anews Banner

Leave A Comment