Home महाराष्ट्र सर्व ग्रामपंचायती , जिल्हा परिषदांवर भगवी गुढी उभारणार

सर्व ग्रामपंचायती , जिल्हा परिषदांवर भगवी गुढी उभारणार

122
0

राजेंद्र पाटील राऊत

सर्व ग्रामपंचायती , जिल्हा परिषदांवर भगवी गुढी उभारणार
⭕युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ सिद्धांत चौधरी पुणे
पुणे ग्रामीण प्रतिनिधी महादेव घोलप⭕

शिवराज्याभिषेक दिन ‘ शिवराज्य दिन ‘ म्हणून साजरा होणार

ग्रामविकास विभागाचा संकल्प मुंबई , दि . 4 ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून हा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षापासून शिवराज्य दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येणार आहे . या दिवशी राज्यातील ग्रामपंचायती , जिल्हा परिषदांवर भगव्या रंगाची गुढी उभारण्यात येणार असून महाराष्ट्र गीत गायनानंतर छत्रपती शिवरायांच्या आदेशपत्राचे जाहीर वाचन होईल , राज्याच्या ग्रामविकास विभागातर्फे हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे . या संदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की ६ जूनला राज्याभिषेक दिन हा शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प आहे . राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिताआहे . त्यामुळे याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर केला जाणार नाही . पण आचारसंहिता संपल्यावर हा निर्णय जाहीर करता येईल . छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहाने साजरा व्हावा यादृष्टीने ग्रामविकास विभाग हे पाऊल उचलणार आहे . आतापर्यंत शिवराज्याभिषेक दिन रायगडावर साजरा व्हायचा , पण आता हा दिन राज्यभर साजरा करण्याची योजना आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here