• Home
  • मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक मालेगांव पोलिसांची कारवाई

मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक मालेगांव पोलिसांची कारवाई

राजेंद्र पाटील राऊत

double-faced-snake-2.jpg

मांडुळ जातीच्या सापाची तस्करी
करणाऱ्या तिघांना अटक
मालेगांव पोलिसांची कारवाई
मालेगांव,( श्रीमती आशाताई बच्छाव युवा मराठा न्युज नेटवर्क)– औषधे तयार करण्यासाठी मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या तिघांच्या टोळीस विशेष पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे.नामपूर रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ हि धडक कारवाई करण्यात आली आहे.
औषधे तयार करण्यासाठी मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती विशेष पोलिस पथकाच्या हाती लागल्याने त्यांनी नामपूर रोडवर सापळा रचून यावेळी तेथून संशयास्पद जाणारी कार थांबवून तिची झडती घेतल्यावर त्यात मांडुळ जातीचा साप आढळून आला.या प्रकरणी पोलिसांनी रजनेश चवूहाण,सावन चव्हाण,वनिता चव्हाण या तिघांना ताब्यात घेतले आहे.

anews Banner

Leave A Comment