Home Breaking News वास्तुपुरुषाची जन्मकथा मत्स्यपुराण नुसार व वास्तुशास्त्राचा उगम व विकास

वास्तुपुरुषाची जन्मकथा मत्स्यपुराण नुसार व वास्तुशास्त्राचा उगम व विकास

202
0

राजेंद्र पाटील राऊत

वास्तुपुरुषाची जन्मकथा मत्स्यपुराण नुसार व वास्तुशास्त्राचा उगम व विकास

संकलन

सिध्दांत चौधरी गुरुजी पुणे भोसरी
प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क

आज आपण या लेखात वास्तुपुरूष हा कोण व याचा जन्म व वास्तु हा शास्त्र का झाले व पुढील लेखात वास्तुशांति पुजन का करावी व प्रथम वास्तुशास्त्राची विद्या कोणास प्राप्त झाली व दिशाची माहिती वास्तुशास्त्राचा विस्तार व असे अनेक
या वास्तु विषयावर अनेक ऋषिनी पुढील ग्रंथ लिहिले मयमतम, मानसारम, कामिका आगम, समरगण, सूत्रधार, राजवल्लभ, विश्वकर्माप्रकाश, अपराजित पूच्छ चंदिका, काश्यपशिल्प, वृक्षायुवेद, बृहत्संहिता असे वास्तुशास्त्राला वाहिलेले आणि हजारॊ वर्षाची ऋषीमूनीची पंरपरा सांगणारे ग्रंथ श्रेष्ट भारतभुमीत आहेत.
मी या ऋषिच्या ग्रंथाच्या नुसार माझ्या अभ्यासातुन पुढे माहिती आपणास देइल व आपण पण आपल्या जीवनात अमलात आणा.

श्री वास्तुपुरुषाची जन्मकथा मत्स्यपुराण नुसार:-

फार प्राचीन काळी अंधकासुर नावाचा महापराक्रमी राक्षस होता । पराक्रमी होता त्याचा त्याला फार गर्व होता मुळात देव-राक्षस वैर्य मग काय आपल्या परक्रमाच्या गर्वाने मदमस्त झालेल्या या अन्धकासुराने देवांना सळो की पळो केले होते त्याच्या त्रासाने हतबल झालेल्या देवांनी त्राही त्राही भगवन म्हणत श्री शंभु महदेवांकड़े धाव घेतली महादेवांनी लगेचच शस्त्र उचलले त्यांनी अंधकासुराला युद्धाचे आवहान केले त्याने आवहान स्वीकारले । श्री शिवशंकर आणि अंधकासुर यांच्यात घनघोर युद्ध झाले पण शेवटी श्री शिवशंकरांचा विजय झाला । अंधकासुर मरण पावला । या युद्धामध्ये झालेल्या परिश्रमाने शंकरांच्या अंगाला ज्या घामाच्या धारा सुटल्या, त्यातील एका घामाच्या थेंबातुन एका करालपुरुषाचा जन्म झाला हाच तो वास्तुपुरुष आहेत

या करालपुरुषाने तेथेच मरूण पडलेल्या अन्धकासुराच्या प्रेताचा प्रथामतः फडशा पाडला पण त्याची भूख कही केल्या भागेना मग त्याने भगवन श्रीशिवशंकरांची आराधना केलि आणि त्यांच्याकडे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यावरील काहीही खावुन टाकन्याची अनुमति मागितली वर मागताच वर देने आशी ख्याति भोलेनाथ श्री शिवशंकर यांची त्यानी त्याला तथास्तु म्हणुन वर दीला । वर मिळाल्यावर त्याने जे कही दीसेल ते खावुन टाकन्यास सुरुवात केली त्याने मंदिर, डोंगर, घर, वृक्ष, प्रसाद, प्रासाद काहीही मागे सोडले नाही त्याने अक्षरशः खाण्याचा सपाटाच लावला, त्यामुळे तीन्ही लोकांत हाहाःकार उडाला देव, दानव, मानव सर्वच घाबरले । या करालपुरुषाला कसे आवरयचे ? असा मोठा प्रश्न त्यांना पडला कारण तो शिवपुत्र होता (त्याचा जन्म शिवशंकर यांच्या घामाच्या थेंबातुन झालेला।) त्याला युद्धात पराजीत करनहि कठिन होते । आता काय करावे सर्वच मोठया प्रश्न पडले.

देव-दानव यांना त्यांच्यातील वैर विसरून एकत्र यावे लागले । दोघांनी मिळुन एक युक्ति शोधली त्याप्रमाणे ते दोघेही एकाचवेळी वास्तुपुरुषावर चाल करुन गेले त्यांनी ठरवलेल्या युक्तीप्रमाणे त्याला पकडले व जमिनीवर पालथे पाडून दाबुन धरले त्यावेळी त्याचे डोके ईशान्य दिशेकडे राहिल याची दक्षता घेतली ।

वस्तुपुरुषाला खाली पालथे पाडल्यावर प्रतेक देव-दानव यांनी तो उठू नये म्हणुन त्याला सगळीकडून प्रतेकी एकाने धरून ठेवले । ईशान्य ही दिशा शिवशंकर यांची आपल्या पित्याच्या पायावर डोके आल्यामुळे आपल्या पित्याला हात जोडून नमस्कार करणे तसेच आर्शीवाद घेण्यासाठी तेथे थांबने या गोष्टी ओघाने आल्याच । देव-दानव यांनी श्री शिवशंकर यांची करुना भाकाली आणि त्यांनी त्यांच्या पुत्राला समज द्यावी अशी विनंती केलि । पण त्याल्या शिवशंकर यांनी काहीही काहीही खावुन टाकण्याचा वर दिला होता । मग सर्वांची परत बराच वेळ चर्चा झाली । सरतेशेवटी एक तोडगा निघाला । या तोडग्यानुसार पृथ्विवरिल सर्व मानवांनी दररोज भोजन आधी एक घास वास्तुपुरुषासाठी बाजूला काढावा व हेच अन्न त्याने त्याचा नित्य आहार म्हणुन खावे तसेच नविन घर बांदल्यावर वास्तुपुरुषाची पूजा करावी व त्यावेळी त्याला दिलेले अन्न त्याचा नेहमीचा आहार असावे । आशा घराचे रक्षण वास्तुपुरुषाने करावे असे ठरले ।या सोबतच श्रीमहादेवाने वास्तुपुरुषला नेहमीच तु तथ्थातु असे म्हणत रहाशील असे वरदान दिले.

तसेच यज्ञ उत्सवाच्या वेळी प्रारंभी दिलेला बलि (नैवेज्ञ) हाही तुझाच आहार राहिल तसेच जे नविन घर निर्माण करेल त्त्या घराची वास्तुशांति पुजा करनार नाहीत तेहि तुझाच आहार बनतील तसेच अज्ञानाने केलेला यज्ञ हाही तुझाच आहार राहिल । आशा प्रकारे त्याला वचन दिले गेले आणि पुढे तो वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला । तेव्हापासून वास्तुशांति करण्याची प्रथा प्रचलित झाली । कोणतीही नविन वास्तु बंधल्यावर किंवा वस्तुत कोताही बदल (जीर्णोद्धार) केल्यानंतर वास्तुशांति करणे अनिवार्य आहे । नाहीतर ती वास्तु वस्तुपुरुशाचा आहार बनेल व तेथे स्मशान होइल असा उल्लेख मत्स्यपुराण अध्याय-२५३ मध्ये ओवी नम्बर १७, १८, १९ मध्ये उल्लेखले आहे।

वास्तुपुरुष पालथा पडल्यानंतर तो उठू नये म्हणुन त्याला देव-दानव यांनी सगळीकडून चारही बाजूने तसेच त्याच्या अंगावर चढूण धरून ठेवले होते त्याच्या त्या शरीराचा तो तो प्रतेक भाग त्यावर स्थान्पत्र झालेल्या देवतेच्या नावाने ओळखला जावू लागला । सर्व देवतांचा यावर निवास असल्यामुळे तो पुढे वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला। त्याला पकडून धरलेल्या एकूण 81 देवता आहेत व त्या त्याच्या अंगावर स्थानापत्र आहेत त्याची आकृति पुढे आहे । वास्तुपुरुष आणि त्याच्या अंगावर 9 उभ्या व 9 अडव्या रेखांकित केलेल्या 81 देवतांच्या या रेखाचित्रास वास्तुपदमंडल असे म्हणतात । याचा उपयोग मनुष्यास राहण्ययोग्य निवास बांधताना होतो । कारण यातील प्रतेक देवतेचे वेगळे एक तत्त्व आहे । त्या तत्वानुसार प्रतेक स्थानाची फलश्रुति प्राप्त होते । बांधकाम करतांन जर यात कही दोष राहिले तर त्या त्या देवतेच्या तत्वाची हनी होते व त्याचा त्रास वास्तु मालकास तसेच त्या वास्तूत निवास करणारी व्यक्तिस होतो । म्हणुन वास्तु-निवासचे बांधकाम करताना याची काळजी घ्यावी लागते ।

नोट:- यामुळेच कोणीही नविन घर, फ्लैट, रोहाऊस, दुकान किवा आपल्या मालकी नविन अथवा जुनी वास्तु घेतल्यास वास्तु शांति करवी एकदा वास्तु शांती केल्यावर हा श्रीवास्तु देव आपले सात पिढ्या पर्यंत रक्षण करतो.

Previous articleकागल तालुक्यातील महीलेचा सँनिटायझर स्फोटात मृत्यू
Next articleमांडुळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक मालेगांव पोलिसांची कारवाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here