Home पुणे पुण्यात ‘रेमडेसिवीर’चा प्रचंड तुटवडा…

पुण्यात ‘रेमडेसिवीर’चा प्रचंड तुटवडा…

149
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पुण्यात ‘रेमडेसिवीर’चा प्रचंड तुटवडा… 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे –⭕करोना संसर्ग झालेल्या गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना “रेमडेसिवीर’ इंजेक्‍शन परिणामकारक ठरत असून जीवदायी ठरणाऱ्या या इंजेक्‍शनचा पुण्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.आपल्या घरातील व्यक्‍ती, नातेवाईक, मित्राची आरोग्य स्थिती गंभीर असताना अशा रुग्णांसाठी डॉक्‍टरांच्या मागणीनुसार “रेमडेसिवीर’साठी जवळच्या नातेवाइकांची मोठी धावपळ होत असून या इंजेक्‍शनसाठी प्राण कंठाशी येत आहेत. गेल्या एक-दोन दिवसात तर शहरात “रेमडेसिविर’चा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून यात होणाऱ्या काळाबाजाराची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली आहे.

यातून असा काळाबाजार रोखण्याकरिता स्वतंत्र समितीही स्थापन करण्याच्या सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केल्या आहेत.
शहरात घडलेल्या घटनांबाबत माहिती अशी की, शुक्रवार पेठेतील केमिस्ट असोसिएशनच्या ऑफिसमध्ये करोना रुग्णांना उपयुक्‍त ठरणारे “रेमडेसिवीर’ इंजेक्‍शन मिळेल म्हणून वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावरील माहितीवरून शेकडो रुग्णांचे नातेवाईक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

मात्र, साठा कमी असल्याने विना अन्नपाणी तासन्‌तास रांगेत ताटकळत उभा राहणाऱ्यसा नातेवाइकांच्या पदरी निराशाच पडत आहे.

शुक्रवार पेठेतील केमिस्ट असोसिएशनच्या ऑफिसमध्ये कसलेही बिल न देता शासकीय नियमांची पूर्तता करून कागदपत्र घेऊन 4800 रुपये किमतीची लस 2000 रुपयांना देण्यात येत होती. अनेक जणांना आधार कार्ड, डॉक्‍टरांचे मूळ प्रिस्क्रिप्शन, रुग्ण पॉझिटिव्ह रिपोर्टची झेरॉक्‍स नसल्यामुळे औषधे दिली गेली नाहीत. झेरॉक्‍स काढण्यासाठी दुकाने शोधण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक रडकुंडीला आल्याचे चित्र होते अनेक तास रांगेत थांबून फक्‍त झेरॉक्‍स नाही म्हणून इंजेक्‍शन मिळाले नसल्याचे अनेकांनी सांगितले. ⭕

Previous articleअहमदनगर जिल्ह्यातील समनापुरमध्ये त्या’ प्रसिद्ध चाचाचे वडापाव सेंटर सील 🛑
Next articleमालेगांव तालुका वासियांच्या मुखातून सध्या तरी एकच हुंकार संकट समयी तमाम गोरगरिब जनते साठी मदतीचा हात पुढे करुन खऱ्या अर्थाने दिलासा देणारा नेता असावा तर फक्त बंडु काका बच्छाव यांच्या सारखा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here