Home भंडारा सिल्ली येथील प्राथमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

सिल्ली येथील प्राथमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

46
0

आशाताई बच्छाव

1000287846.jpg

सिल्ली येथील प्राथमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) तालुक्यातील सिल्ली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली .यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे भीम गीत सादरीकरण करण्यात आले .माणसाला जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे मनाला वाचनाची गरज आहे .वाचनाने मनुष्याचे मस्तक सशक्त होते आणि सशक्त मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही .डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचनाचा व्यासंग आपण आपल्या जीवनात अंगीकारता तरच आपले मन, मनगट आणि मेंदू सशक्त झाल्याशिवाय राहणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोज 18 तास वाचन करत असायचे आपण सुद्धा आपल्यालाही सवय लावली तर आपण आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जात ,धर्म ,पंथ असा कोणताही भेद न पाळता मी प्रथम भारतीय आणि शेवटी भारतीय हे आपल्या हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे अशाप्रकारेचेमनोगत विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता शाळेचे मुख्याध्यापक किरण मेश्राम यांनी मार्गदर्शन केले .यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका ,विद्यार्थिनी विद्यार्थि,प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleशांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे आंबेडकर जयंती साजरी
Next articleअनसिंग येथे भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here