• Home
  • 🛑 कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने राज्यपालांनी केली COVID टेस्ट, निकालही आला 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने राज्यपालांनी केली COVID टेस्ट, निकालही आला 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने राज्यपालांनी केली COVID टेस्ट, निकालही आला 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 13 जुलै : ⭕ राजभवनातले कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कोरोना चाचणी केली आहे. या चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला आहे. राजभवानानेच ही माहिती दिली आहे. आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो अशी माहितीही राज्यपालांनी दिली आहे.

राजभवनावर 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. राजभवनावरील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत 55 जणांचे अहवाल हाती आले आहे. यात 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

यात सर्वात आधी एक वायरमॅन कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याची सर्वात आधी चाचणी करण्यात आली होती. अद्याप 45 लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यपालही क्वारंटाइनमध्ये आहेत असं वृत्त आलं होतं मात्र आपण सगळी काळजी घेत असून क्वारंटाइन नाही असंही राज्यपालांनी सांगितलं आहे. आता राजभवनाने भेटी गाठी थोड्या कमी केल्या असून वर्दळ टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर सर्व राजभवनही सॅनिटाईज  करण्यात आलं आहे.

मुंबई आणि परिसरात दररोज प्रचंड संख्येत रुग्ण वाढत असून राज्याचा कोरोनाबधितांचा आकडा आता अडीच लाखांच्या जवळ गेला आहे. तर राज्यातल्या मृत्यूची संख्या 10 हजारांच्या वर गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.⭕

anews Banner

Leave A Comment