Home जळगाव ग्राहक दिनानिमित्त चाळीसगाव तहसील कार्यालयात 24 रोजी निबंध स्पर्धा

ग्राहक दिनानिमित्त चाळीसगाव तहसील कार्यालयात 24 रोजी निबंध स्पर्धा

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20231213_064046.jpg

ग्राहक दिनानिमित्त चाळीसगाव तहसील कार्यालयात 24 रोजी निबंध स्पर्धा

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- 24 डिसेंबर 2023 हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे सकाळी 10 वाजता साजरा करण्यात येणार आहे.
“राष्ट्रीय ग्राहक दिन 2023” या दिनानिमित्त ए आर. डिजिटल प्रेस मिडिया कौन्सिल च्या अंतर्गत कन्झुमर प्रोटेक्शन अँड अवेरनेस विंग च्या सहभागातून जिल्ह्यातील विध्यार्थ्यांच्या / ग्राहकांच्या प्रबोधनासाठी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा व जिल्हा पुरवठा शाखा यांच्या संयुक्त सहभागातून यंदा निबंध स्पर्धा आयोजित केल्या असून माध्यमिक विभागाकडील सर्व शाळेतून राष्ट्रीय ग्राहक दिनाच्यानिमित्त निबंधस्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
निबंध स्पर्धा विद्यार्थी गट व खुला गट मध्ये होणार आहे
विद्यार्थी गटात जागो ग्राहक जागो, तक्रार करणार त्याला न्याय मिळणार, अर्थव्यवस्थेचा केंद्र बिंदू हे 3 विषय असणार आहेत तर शब्द मर्यादा 500 असणार आहे व खुल्या गटात प्रभावी ग्राहक संरक्षण अधिनियम 2019, चंगळवाद आणि ग्राहक व ऑनलाईन
खरेदी व्यवहारातील धोके व उपाय हे 3 विषय असणार आहेत व शब्दमर्यादा 800 असणार आहे. स्पर्धेत बक्षीस
विद्यार्थी गट प्रथम – स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 2000 रुपये रोख, द्वितीय- स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 1000 रुपये रोख, तृतीय-स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 500 रुपये रोख उत्तेजनार्थ प्रमाणपत्र
तर खुला गट प्रथम – स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 3000 रुपये रोख, द्वितीय- स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 2000 रुपये रोख, तृतीय- स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 1000 रुपये रोख उत्तेजनार्थ प्रमाणपत्र असे आहे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या हस्ते, तालुकास्तरावर तहसीलदार
तालुका पुरवठा अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे
ही स्पर्धा जळगाव, छ. संभाजीनगर, धुळे जिल्यातील माध्यमिक स्तरावरून शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी राहील. स्पर्धा निःशुल्क असून DPMC च्या कडे नोंदणी अनिवार्य राहील,
लिंक:-https://www.pressmediacouncil.org/esssaywritingcompetition
नोंदणी link दि. 1/12/2023 पासून खुली होऊन ती 22/12/2023 रोजी बंद होईल,
विधार्थ्यांनी निवडलेला विषयाचा निबंध स्वहस्ते लिहिलेला असावा. टाईप केलेला नसावा, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील
व सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Previous articleहाडोळी गावला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार सरपंच माधवराव आमृतवाड यांच्या प्रयत्नाला यश
Next articleध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा;
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here