*अबुलगा येथील शेतकऱ्यांने दिला आत्महत्या करण्याचा चा इशारा…*
जाहूर ,(प्रतिनिधी मनोज बिरादार)-
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा बु. येथील शेतकरी गंगाधर भुमन्ना कोमवाड यांच्या शेतीच्या खालून तलाव आहे. त्या तलावाचे संरक्षण असलेले बांध फुटून शेतात पाणी
शिरत आहे. व रस्त्याच्या बाजूच्या नाल्याचे पाणी हे सुध्दा शेतात शिरुन माती वाहून जात आहे.पिकाचे नुकसान होत आहे.व जमिन खरडून जात असल्यामुळे, बांध घालून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. यासाठी दि २ आॅक्टोबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.तात्काळ बांध घालून नुकसान भरपाई द्यावी.अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार, उपोषण करून जर न्याय नाही मिळाले.तर संपूर्ण कुटूंबाला घेऊन, आत्महत्या करण्याचा इशारा जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना दिले आहे.
गंगाधर भुमन्ना कोमवाड या शेतकऱ्यांची मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा बु) येथे त्याच्या मालकीचे गट क्र.२१७ मध्ये १.६९ आर एवढी शेती आहे.त्याच्या शेतीच्या खालच्या दक्षिण दक्षिणेला तलाव आहे.यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे हा तलाव मोठ्या प्रमाणात भरला आहे.अतिवृष्टी पावसाच्या पुराच्या पाण्यात त्याच्या शेतीला संरक्षण असलेला बांध फुटून जमिनीवर पिकासह संपूर्ण बांध पुराच्या पाण्यात वाहून गेले यामुळे त्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.
तसेच शेताच्या उत्तरेला ईटग्याळ रस्ता आहे. या रस्त्याचे काम केले.मात्र रस्त्याच्या बाजून नाल्याचे काम निट केले नसल्यामुळे,नाल्याचे संपूर्ण पाणी त्याच्या शेतामध्ये येत आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीचे व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.व शेतातील माती वाहुन जाऊन जमीन खरडून जात आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात शेतातील संपुर्ण माती तलावात वाहुन जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे मा.जिल्हाधिकारी व तहसिलदार साहेबांनी सदर परिस्थितीचा तात्काळ पंचनाम करुन.त्याच्या शेताला मजबूत संरक्षण बांध घालून,नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. १० नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता पासुन त्याचे संपुर्ण कुटुंब अमरण उपोषण करणार आहेत. उपोषण करुन जर न्याय नाही मिळाल्यास संपुर्ण कुटुंबाला सोबत घेऊन. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करणार असल्याचे निवेदन आंबुलगा येथील,शेतकरी गंगाधर भुमन्ना कोमवाड यांनी जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना दिले आहे.