Home अमरावती ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा;

ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा;

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_060833.jpg

ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा;

निधी संकलनात सढळ हाताने मदत करावी- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

गजानन जिरापुरे
जिल्हा प्रतिनिधी अमरावती

अमरावती, दि. 13 : देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून प्रत्येक नागरिकाने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. यंदा निधी संकलनाचे उद्दिष्ट 1 कोटी 10 लक्ष रूपये आहे. या राष्ट्रीय कार्यात अमरावती जिल्ह्याने यापूर्वीही उत्स्फूर्तपणे योगदान दिले आहे. आताही हे उद्दिष्ट 28 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्यासाठी सढळ हातांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करताना आज सांगितले.

 

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन भवनात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन व सैनिक मेळावा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवल, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, पोलीस ठाणेदार कैलास पुंडकर, फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे, ब्रिगेडियर शंतनू मयंकर, कर्णल लक्ष्मण गाले आदी उपस्थित होते. शहिद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्यपदकधारक व सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार, तसेच दिवंगत सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही यावेळी झाले.

 

जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले की, भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेशानंतर प्रशिक्षण घेताना सिक्कीम राज्यात सेनादलाचे कार्य प्रत्यक्ष जाणून घेता आले. देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत खडतर परिस्थितीत प्राणांची बाजी लावून सैनिक कार्य करत असतात. सेवानिवृत्तीनंतरही सैनिक गावांमध्ये विविध उपक्रमांत पुढाकार घेऊन योगदान देतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून ध्वजदिन निधीत प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. माजी सैनिक तसेच सिमा संरक्षणासाठी कर्तव्यावर असलेल्या सैनिकांच्या कुटूंबावर येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर राहिल, अशी ग्वाही श्री.कटियार यांनी दिली.

 

ध्वजनिधीसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते 19 लक्ष रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच उपस्थित माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी ध्वज निधी जमा केला.

 

देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी, तसेच युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी ध्वजनिधीचा उपयोग होतो. अमरावती जिल्ह्यात गतवर्षी 1 कोट 10 लक्ष उद्दिष्टाच्या तुलनेत 1 कोटी 17 लक्ष रूपये निधी संकलित झाला. त्याची टक्केवारी 106 इतकी आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवल यांनी प्रास्ताविकात सांगितले. वैभव निमकर यांनी संचालन व आभार मानले.

Previous articleग्राहक दिनानिमित्त चाळीसगाव तहसील कार्यालयात 24 रोजी निबंध स्पर्धा
Next articleसाधना जराते च्या मृत्यू प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here