Home पुणे मास्क’ न लावता धुळवड पडली महागात; बाप-बेटे ‘गजाआड’ 🛑

मास्क’ न लावता धुळवड पडली महागात; बाप-बेटे ‘गजाआड’ 🛑

197
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 ‘मास्क’ न लावता धुळवड पडली महागात; बाप-बेटे ‘गजाआड’ 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे –⭕मास्क न लवता धुळवड साजरी करत असताना रोखल्याने पोलीस कर्मचाऱ्यास धक्का-बुक्की करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी वडिल व मुलाला अटक केली आहे.

ही घटना कात्रज येथील सच्चाईमाता मंदिराजवळील पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनीक रस्त्यावर घडली.पोलीस अंमलदार गणेश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संदिप सोमनाथ भोवते(45) व सागर संदिप भोवते(19) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दोघेही आरोपी सार्वजनीक रस्त्यावर स्पीकर लावून सोशल डिस्टंस न पाळता तसेच मास्क न लावता नाच करत होते.
त्यांना फिर्यादी काळे यांनी येथे गोंधळ घालू नका असे समजावून सांगितले.

मात्र दोघांनीही त्यांना शिवीगाळ करत धक्का-बुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे करत आहेत.⭕

Previous articleबातम्या लॉकडाउनची गरज पुण्यात भासणार नाही, कारण 🛑
Next articleबेधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवले ,तीन जागीच ठार , रोहा- सालाव रस्त्यावर हृदयद्रावक घटना 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here