Home माझं गाव माझं गा-हाणं बेधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवले ,तीन जागीच ठार , रोहा- सालाव...

बेधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवले ,तीन जागीच ठार , रोहा- सालाव रस्त्यावर हृदयद्रावक घटना 🛑

96
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 बेधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवले ,तीन जागीच ठार , रोहा- सालाव रस्त्यावर हृदयद्रावक घटना 🛑
✍️ रोहा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रोहा -⭕रेवदंडा येथील जे एस डब्लू येथून रोहा बाजूकडे येणाऱ्या ट्रकच्या चालकाने बेधुंदपणे गाडी चालवत रेवदंडा ते चणेरा मार्गावरील वाहन चालविणाऱ्या व पायपीट करणाऱ्या आठ लोकांना उडवले असून त्यातील तीन जण जागीच ठार झाले असून एक महिला अत्यवस्थ आहे.

प्राथमिक माहितीनुसार चार जण जखमी आहेत. या हृदयद्रावक घटनेची माहिती समजताच संतप्त जमावाने ट्रक चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे चणेरा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रेवदंडा बाजूकडून एम एच ०४ ई वाय ८५०१ या गाडीच्या चालकाने बेधुंदपणे गाडी चालवत साळाव ,आमली येथे प्रत्येकी एक व्यक्तींना तर चेहेर येथे दोन व्यक्तींना ठोकर मारून जखमी केले.

त्यानंतर जमावाकडून मारहाण होईल या भीतीने ट्रक चालकाने भरधाव वेगाने गाडी रोहा बाजूकडे चालवत नेली.पुढील गावात सदर घटनेची खबर मिळताच स्थानिकांनी सदर ट्रक अडविण्यासाठी प्रयत्न केला असता त्याने अनेक गाड्या व अडथळे उडवून लावत भरधाव वेगाने ट्रक चालवत न्हावे फाटा नजीक एका जोडप्याला व त्यांच्या लहानग्या मुलाला उडवले.यामध्ये जि.प. शाळा शिक्षक लक्ष्मण ढेबे व त्यांचा मुलगा जागीच ठार झाला असून त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.सदर धडक इतकी जोरात होती की संबंधित शिक्षकांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून गाडी सुमारे चारशे मिटर फरफटत गेली आहे.त्यानंतर सदर चालकाने सारसोली गावाच्या पुढे चणेरा येथील नागरिक उदय वाकडे याला ठोकरल्याने सदर व्यक्ती देखील जागीच मृत झाली आहे.भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या या चालकाला चांडगाव नजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.

सदर घटनेचे वृत्त समजताच स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोनि नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.या घटनेमुळे स्थानिक जनतेमध्ये मोठा प्रक्षोभ आहे.

दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे आपल्या असंख्य शिवसॅनिकांसमवेत घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. व ट्रक चालकावर कडक कारवाईची मागणी केली. ⭕

Previous articleमास्क’ न लावता धुळवड पडली महागात; बाप-बेटे ‘गजाआड’ 🛑
Next articleजीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला गरीबांची डाळ शिजेना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here