Home Breaking News स्मार्टफोन १५ हजार पेक्षा कमी किंमतीत येत आहेत 🛑 ✍️पुणे ( विलास...

स्मार्टफोन १५ हजार पेक्षा कमी किंमतीत येत आहेत 🛑 ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

111
0

🛑 स्मार्टफोन १५ हजार पेक्षा कमी किंमतीत येत आहेत 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )­

⭕ तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? पण बजेट आडवा येतोय का? काही काळजी करु नका.

१५ हजारमध्ये जंबो बॅटरीसह उत्कृष्ठ असे स्मार्टफोन येतात. बाजारपेठेत १५,००० पर्यंतच्या किंमतीत बरेच स्मार्टफोन आहेत, ज्यामध्ये आपल्याला 4,000 ते 5,000 mAh बॅटरी आणि नवीनतम वैशिष्ट्यांचा सपोर्ट मिळेल. चला अशा उत्कृष्ट स्मार्टफोनबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.

⭕ Realme 6 ⭕

हा स्मार्टफोन नुकताच चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने लाँच केला आहे. वैशिष्ट्यांविषयी बोलताना या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये 90Hzचा रीफ्रेश रेट आहे. या व्यतिरिक्त, ऑक्टॅकोर प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये मीडिया हेलिओ G90T प्रोसेसर देण्यात आला आहे.
तसंच, दीर्घकालीन वापरासाठी, यात 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे.

⭕सॅमसंग गॅलेक्सी M30 ⭕

सॅमसंगने गेल्या वर्षी हा फोन बाजारात बाजारात आणला होता. वैशिष्ट्यांविषयी बोलताना हा फोन 5,000 mAh बॅटरीसह येतो. यासह, वापरकर्त्यांना ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, सुपर अमोलेड डिस्प्ले आणि उत्कृष्ट प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर गॅलेक्सी M30 च्या 4GB रॅम + 64GB स्टोरेजची किंमत १२,२७९ रुपये आहे.

⭕ इन्फिनिक्स हॉट 7 प्रो ⭕

इन्फिनिक्स हॉट 7 प्रो स्मार्टफोनची किमत १०,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. यासह फोनमध्ये 6.19 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय या फोनमध्ये चांगल्या कामगिरीसाठी
4,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

⭕ रेडमी नोट 7 प्रो ⭕

शाओमीचा हा स्मार्टफोन सर्वात लोकप्रिय स्मार्टफोनपैकी एक आहे. या फोनचे 6GB रॅम + 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किमत १२,९९९ रुपये आहे. कंपनीने ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. ज्याचा एस्पेक्ट रेशो १९:५:९ आहे. तसंच डिस्प्लेमध्ये गोरिल्ला ग्लास ५ चे संरक्षण देण्यात आलं आहे. याशिवाय चांगल्या कामगिरीसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट आणि 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

⭕ मोटो जी 8 प्लस ⭕

हा मोटोरोला स्मार्टफोन केवळ १२,९९९ रुपयात खरेदी करता येईल. या फोनमध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिझोल्यूशन 1080×2280 पिक्सल आहे. तसेच यू-शेप नॉच देखील देण्यात आला आहे. चांगल्या कामगिरीसाठी यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 एसओसी आणि 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here