• Home
  • 🛑 पुणे शहरातील ३३ उद्याने १८ जूनपासून बंद ! महापौर 🛑 ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पुणे शहरातील ३३ उद्याने १८ जूनपासून बंद ! महापौर 🛑 ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पुणे शहरातील ३३ उद्याने १८ जूनपासून बंद ! महापौर 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासन देखील 24 तास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, पुणे शहरातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णांची संख्या लक्षात घेवून महापालिका प्रशासनाने उद्यापासून म्हणजेच 18 जून पासून शहरातील 33 उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सर्व पुणेकर नागरिकांना प्रशासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

उद्याने बंद करण्याचा निर्णय घेण्याची ५ प्रमुख कारणे…
१) ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची प्रतिकार क्षमता कमी असते.
उद्यानातील लहान मुलांची खेळण्याची साधने अथवा ज्येष्ठ नागरिकांची व्यायामाची साधने लोखंडी असल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो.

२) मास्क घालून व्यायाम करू नये, असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे उद्यानात मास्क घालून व्यायाम करणे फायद्याचे ठरणार नाही.

३) उद्याने सुरू झाल्यानंतर, आज कोरोना कामासाठी लावलेली उद्यान विभागाची यंत्रणा काढून सुरक्षारक्षक, माळी काम करणारे इ. परत उद्यानात कामाला आणावे लागेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण वाढेल.

४) उद्यान सुरू झाल्यानंतर भेळ, पाणीपुरी इ. हातगाड्या बाहेर लागतील, त्यामुळे अतिक्रमण खात्यातील मनुष्यबळ जे कोरोनासाठी लावलेल्या यंत्रणेवर ताण पडेल.

५) अत्यावश्यक गरज नसताना उद्यान चालू करणे म्हणजे संसर्गाला आमंत्रण देणे, रोगाचा प्रसार वाढणे. त्यामुळे त्याचा फार मोठा तोटा होवू शकतो. तसेच कोरोना यंत्रणेत मनुष्यबळ आधीच कमी आहे, आणि त्यामुळे यंत्रणेवर ताण वाढेल.
त्यामुळे उद्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या फिरण्यासाठी टेकडी, मैदाने खुले आहेत,

त्यामुळे उद्यान सुरू करण्याचा निर्णय समाजाच्या हिताचा नाही, भविष्य काळात त्याचा विचार करू असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे….⭕

anews Banner

Leave A Comment