Home Breaking News भंडारा जिल्ह्यात आज ५ नवे रुग्ण कोरोना बाधित सापडले 🛑 ✍️ (...

भंडारा जिल्ह्यात आज ५ नवे रुग्ण कोरोना बाधित सापडले 🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

169
0

🛑 भंडारा जिल्ह्यात आज ५ नवे रुग्ण कोरोना बाधित सापडले 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

भंडारा :⭕ जिल्ह्यात आज 5 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण लाखनी तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 41 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आता 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 58 एव्हढी आहे. नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल आज 17 जून रोजी प्राप्त झाला असून आज पाच व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण लाखनी तालुक्यातील आहेत. जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 58 इतकी असून यामध्ये क्रियाशील रुग्ण 17 आहेत तर 41 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 3055 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 58 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 2993 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. चार नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
आज 17 जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 14 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 414 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 378 भरती आहेत. 2256 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे, मुंबई व इतर राज्यातून 42343 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 36629 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 5713 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत…⭕

Previous articleसातारा जिल्ह्यात सात नवे पाँझिटिव्ह 🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next article🛑 पुणे शहरातील ३३ उद्याने १८ जूनपासून बंद ! महापौर 🛑 ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here