• Home
  • सातारा जिल्ह्यात सात नवे पाँझिटिव्ह 🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा जिल्ह्यात सात नवे पाँझिटिव्ह 🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 सातारा जिल्ह्यात सात नवे पाँझिटिव्ह 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा ⭕ – जिल्ह्यातील सात जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७७३ झाली आहे.

बुधवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार पुण्यातील एन. सी. सी. एस. येथे तपासणी करण्यात आलेल्या ७ नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यापैकी तिघांचा रिपोर्ट मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

या सात जणांमध्ये कोरेगाव तालुक्यातील चोरगेवाडी येथील २७ वर्षीय पुरुष, रविवार पेठ सातारा येथील १४ वर्षाची मुलगी, सातारा तालुक्यातील पिंपळवाडी येथील ५६ वर्षीय महिला, वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर येथील ९ वर्षाची बालिका, पाटण तालुक्यातील मूळ गोवारे येथील १४ जून रोजी मुंबई येथून आलेला ५० वर्षीय पुरुष गावच्या शाळेतील विलगीकरणात असताना १६ जून रोजी अचानक मृत पावला होता, हावळेवाडी ( बहुले ) येथे १४ जून रोजी ४५ वर्षीय महिला मानखुर्द मुंबई येथून आली होती आणि घरातच विलगीकरणात मृत्यू पावली होती.
जावळी तालुक्यातील शिंदेवाडी येथील ५० वर्षीय पुरुष, १२ जून रोजी मुंबईवरून आला होता. १६ जून रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे हॉस्पिटलला आणत असताना रस्त्यात मृत्यू झाला. अशा एकूण तिघांचा रिपोर्ट मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले…⭕

anews Banner

Leave A Comment