Home अमरावती सुषमा अंधारे अमरावती आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला लक्ष...

सुषमा अंधारे अमरावती आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला लक्ष केले.

73
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230818-193201_WhatsApp.jpg

सुषमा अंधारे अमरावती आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला लक्ष केले.
दैनिक युवा मराठा
पी.एन..देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात हनुमान चालीसा पठण करण्यावरून चांगलाच बदलून झाल्याचा पाहायला मिळाले होते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बंगला समोर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर, शिवसैनिकांनी त्यांच्या मुंबईतील घराबाहेर गर्दी केली होती. त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता. तेव्हापासून हनुमान चालीसा हा राष्ट्रीय मुद्दा बनण्याचा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चक्क सभागृहातच हनुमान चालीसा म्हणून दाखवली. आता, त्यावरील शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांनी थेट अमरावतीतून प्रश्न उपस्थित केला आहे. सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष केले. यावेळी, हनुमान चालीसा च्या मुद्द्यावरून नवनीत राहणार नाही त्यांनी निशाण बनवला. सरकारला प्रश्न विचारले की आवडला नाही. सध्या कसा झालाय, मुस्लिम विरोधात बोलला की त्याला दहशवादी ठरवायचं. दलितांनी विरोधात बोललो की त्याला नक्षलवादी ठरवायचा आणि इतरांनी विरोधात बोललो की त्याला ठरवायचं असं काम सुरू आहे. पण आपण कधी प्रश्न विचारतो काय? असा सवाल शिवसेना नेत्यास सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. खासदार श्रीकांत शिंदे लोकसभा सभागृहात हनुमान चालीसा म्हटली. पण, हनुमान चालीसा म्हटल्याने भारतातील किती प्रश्न सुटेल? हनुमान चालीसा म्हटल्याने सदस्यांच्या जगाचा प्रश्न उपस्थित झाला नसता, ते सदस्य जर जिवंत होणार असतील तर मी दररोज सकाळ दुपार आणि संध्याकाळ हनुमान चालीसा म्हणायला तयार आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने समृद्धी महामार्गावरील २७ देव परत येणार असतील तर, निश्चितपणे आम्ही श्रीकांत शिंदेच्या हनुमान चालीसा समर्थनार्थआहोत. हनुमान चालीसा म्हटलं मणिपूर मध्ये जे घडलं ते रिव्हर्स करून ओके आणि दुरुस्त होत असेल तर हनुमान चालीसा चे स्वागत करू.पण, कुठली गोष्ट तुम्ही कोठे नेता आहे? असा प्रश्न सुषमा अंधेरी अमरावतीमध्ये सभेत विचारला. जेथे लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात, तिथे लोकांचे प्रश्न मानले जात नाही त्यामुळे या डोक्याने तुम्ही कधीतरी हा विचार कराल का? असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थितांना विचारला. तसेच, तिकडे हनुमान चालीसा म्हणण्यापेक्षा ठाण्यातील रुग्णालयात ४ दिवसात २७ रुग्ण दगावले, त्यावर मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव का बोलत नाही. असेही अंधारे यांनी म्हटले आहे.

Previous articleदेशभरातून आणलेल्या पवित्र मातीच्या मंगल कलशांचे वृक्षमित्र अरुण पवार यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजन 
Next articleमराठवाड्यातील मराठा आरक्षणाला राज्य शासनाकडून गती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here