Home मुंबई क. डों. म.महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा ६७ हजारांचा टप्पा पार

क. डों. म.महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा ६७ हजारांचा टप्पा पार

93
0

राजेंद्र पाटील राऊत

क. डों. म.महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा ६७ हजारांचा टप्पा पार

(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा आकडा ६७ हजार पार झाला असून आज २३६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासांत २०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.
महापालिकेने नागरिकांना सुचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आजच्या या २३६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६७,१६२ झाली आहे.
यामध्ये ३०६८ रुग्ण उपचार घेत असून ६२,९०८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २३६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३७, कल्याण प – ६०, डोंबिवली पूर्व -१०१, डोंबिवली प – २३, मांडा टिटवाळा – ११, तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.

Previous article१८ वर्षांपुढील नागरिकांनाही लस द्या 🛑
Next articleकोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, कॉलेज 31 मार्च पर्यंत बंद राहतील जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here