Home वाशिम जैन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर उद्घाटन संपन्न

जैन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर उद्घाटन संपन्न

179
0

राजेंद्र पाटील राऊत

जैन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर उद्घाटन संपन्न

वाशिम:-(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) अनसिंग येथील श्री पदमप्रभ दिगंबर जैन कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दत्तक ग्राम खडसिंग येथे दिनांक 21 मार्च ते 27 मार्च च्या दरम्यान संपन्न होणार आहे. या शिबिराचा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. विवेक गुल्हाणे,अतिथी म्हणून सरपंच सुधाकर मानमोठे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पांढरे, नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक आनंद चव्हाण, अनिल शिंदे, गंगाधर पेचकवाढ, अंगणवाडी सेवीका संगिताताई कड आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सचितानंद बिचेवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरा मागचे प्रयोजन,विद्यार्थी घेत असलेले वेगवेगळे प्रकल्प व प्रबोधनाचे कार्यक्रम या संदर्भामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पांडूरंग पांढरे यांनी खडसिंग गाववाशी यांच्या दृष्टीकोनातून हे शिबीर कसे महत्त्वाचे आहे. यातून गावकरी-विद्यार्थी सुसंवाद साधला जाऊ शकतो हे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक आनंद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक वाटचाल केल्यात अपेक्षित यश सिद्धी पर्यंत आपल्याला जाता येऊ शकते हे आपल्या अनुभवातून कथन केले. याच वेळी अनिल शिंदेने सुद्धा यशस्वी जीवनाची काही सूत्रे व माजी विद्यार्थी म्हणून असलेले आपले अनुभव यावेळी मांडले. सरपंच मानमोडे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम स्वरूपाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना रासेयो शिबीर म्हणजे विद्यार्थ्यांना संस्कारयुक्त घडणी,सामाजिक कार्य करण्यासाठीचे एक उत्तम संधी आहे,म्हणून विद्यार्थ्यांनी याचा चांगला आनंद आणि लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन आकाश घटमाल व प्रतीक्षा सातव हिने, तर आभार निलेश गिरी मानले. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल जैन,प्रा. वैशाली गोरे यांच्यासह सर्व कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

Previous articleरणरणत्या उन्हात ,भाजप नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांच्या शिवम इंडस्ट्रीज येथील कार्यालयास कुल करण्यासाठी प्रभागातील नागरिक एकवटतात तेव्हा!!……..
Next article१२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आरोग्य व शालेय शिक्षण विभागाने संयुक्त नियोजन करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here