Home गडचिरोली रणरणत्या उन्हात ,भाजप नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांच्या शिवम इंडस्ट्रीज येथील कार्यालयास...

रणरणत्या उन्हात ,भाजप नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांच्या शिवम इंडस्ट्रीज येथील कार्यालयास कुल करण्यासाठी प्रभागातील नागरिक एकवटतात तेव्हा!!……..

63
0

राजेंद्र पाटील राऊत

!रणरणत्या उन्हात ,भाजप नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांच्या शिवम इंडस्ट्रीज येथील कार्यालयास कुल करण्यासाठी प्रभागातील नागरिक एकवटतात तेव्हा!!……..
गडचिरोली /सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क , दिनांक 20 मार्च 2022 येथील भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री , नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक , संचालक शिवम अगरबत्ती इंडस्ट्रीज चामोर्शी आशिष भाऊ पिपरे ,नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागातून निवडून आल्या नंतर गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या
मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रभागाचा कायापालट करण्याचा वसा घेतला व संपूर्ण नियोजन करून चामोर्शी शहरात प्रथमच स्वतः चे नगरसेवक कार्यालय सुरू केले कार्यालयात सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी, निराधार योजना , श्रावण बाळ योजना अपंगा करिता शासकीय योजना लाभ ,घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी स्व, खर्चाने मोफत फार्म उपलब्ध करून दिले अती गरिबांसाठी झेरॉक्स प्रत मोफत काढण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे आपल्या शिवम इंडस्ट्रीज येथे आपल्या नगरसेवक जनसंपर्क कार्यालयात सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे अविरत काम सुरू केले आहे प्रभागातील नव्हे तर चामोर्शी शहरातील विविध प्रभागातील अनेक नागरिक सध्या विविध प्रलंबित प्रश्न घेऊन मोठ्या विस्वसाने येत आहेत , आवश्यक ते प्रश्न ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी काम सुरू आहे ,व नागरिकांचा समाधान सुद्धा होत आहे
यातच काल प्रभागातील काही नागरिकांनी तक्रार केली
साहेब….. येथे कुलरची व्यवस्था असूनही खूप गरम होत आहे व आता या महिन्यात ही अवस्था आहे तर पुढील काय होईल !
यावेळी नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी उत्तर दिले ,……!
काय करू इंडस्ट्रीजचे शेड टीनाचे
असल्याने गरम होणारच आहे व तीन हजार स्क्वेअर फूट जागा माझ्याने थंड करणे शक्य नाही?
यावेळी प्रभागातील सर्वसामान्य नागरिक यांनी नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांचा संपूर्ण इंडस्ट्रीज
थंड करण्याचा संकल्प केला व शहराजवळील नाल्यावर मोठ्या प्रमाणात स्पांज मिळतो ही माहिती मिळाली व प्रभागातील सर्व सामान्य नागरिक कोणत्याही
अपेक्षा शिवाय एकवटले आणि स्वतःच तीन चार ट्रकटर घेऊन स्पांज कापायला गेले व रणरणत्या उन्हात कुठलीही अपेक्षा न ठेवता मोठ्या उत्साहाने, घामाने चिंब भिजून स्पांज कापून आणून इंडस्ट्रीज येथील नगरसेवक कार्यालयाच्या वरील भागात पसरवला आणि उन टीनावर उन पडू दिला नाही व आतील भाग संपूर्ण कुल करून टाकला !
आज दुपारी मी भेट दिली तेंव्हा संपूर्ण इंडस्ट्रीज आज खूप थंड होता मी आशीष भाऊ यांना आज तुमचा कार्यालय इतका थंड
कसा हा प्रश्र्न केला ? तेंव्हा ही माहिती मिळाली व मनातून खूप आनंद झाला , नगरसेवक असावा तर असा ज्याच्या जनसंपर्क
कार्यालय गरम होऊ नये म्हणून प्रभागातील सर्वसामान्य नागरिक ऐकवटतात!

Previous articleभारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा बैठकीचे दि.२६ मार्च २ भारतीय ०२२ ला आयोजन 
Next articleजैन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर उद्घाटन संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here