राजेंद्र पाटील राऊत
भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा बैठकीचे दि.२६ मार्च २ भारतीय ०२२ ला आयोजन गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) आज इंदिरा गांधी चोकातील विश्राम भवनामध्ये भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची नियोजनात्मक बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये जिल्हा बैठकीसाठी स्वागत व नोंदणी व्यवस्था महिला आघाडीकडे देण्यात आली.भोजन व्यवस्था गडचिरोली शहर भाजप पदाधिकारी तर सभागृह सजावट व शहर सजावट युवा मोर्चा पदाधिकारी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली.
बैठकीला जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गोविंदजी सारडा,किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, अनिल पोहनकर, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,शहर महामंत्री विनोद देवोजवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर कुंभरे, हर्षल गेडाम, जनार्धन साखरे,महिला आघाडी शहर महामंत्री वैष्णवी नैताम,निताताई उंदीरवाडे, लताताई लाटकर,देवाजी लाटकर, विलास नैताम, अनिल करपे,रामन्ना बोण्डकुलवार,अलमपटलावार भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.