• Home
  • जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पेंटीपाका येथील नवीन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण..!!

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पेंटीपाका येथील नवीन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण..!!

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220321-WA0098.jpg

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पेंटीपाका येथील नवीन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण..!!

गडचिरोली,/सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क:- सिरोंचा तालुक्यातील ग्राम पंचायत पेंटीपाका येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण करण्यात आली आहे..!!

ग्रामपंचायत पेंटीपाका अंतर्गत लांबडपल्ली येथे अंगणवाडी केंद्राचे इमारत खूप जुनी होती. यामुळे लहान बालकांना जीवित हानी होण्याची शक्यता होती, ही बाब जिल्हा परिषद सदस्य जयसुधा जनगाम यांना माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी करून तात्काळ लांबडपल्ली येथे नवीन अंगणवाडी केंद्राचे इमारती मंजूर करून नुकतेच नवीन अंगणवाडी केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे..!!

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आविस सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुन आकुला, नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा, आविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला, आविस कार्यकर्ता गणेश रच्चावार, वासू सपाट, श्रीनिवास दुर्गम, सारय्या दुर्गम, जनार्दन पोट्टाला, बाक्कय्या दुर्गम, लक्ष्मीस्वामी जिमडे, संतोष कडारला, श्रीकांत अंतरगाम, सडवली दुर्गम, मुत्ताय्या माणिकराऊतू, नागराजू कडारलासह पेंटीपाका परिसरातील अविसचे कार्यकर्ते उपस्थित होते..!!

anews Banner

Leave A Comment