Home माझं गाव माझं गा-हाणं मालेगांवात हरिणाची शिकार करुन मास विकणा-यांना अटक

मालेगांवात हरिणाची शिकार करुन मास विकणा-यांना अटक

151
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगाव:- (श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)  येथील उप वनविभाग व विशेष पोलीस पथकाच्या संयुक्त कार्यवाहीत महापालिकेच्या हद्दीतील दरेंगाव शिवारात छापा टाकून तीन आरोपीसह दोन हरणांचे सुमारे 20 ते 25 किलो मांस 1 दुचाकी मोटरसायकल व वजनकाटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मालेगाव चे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी याना गुप्त माहिती मिळाली की,मालेगाव शहराजवळील दरेंगाव भागात काही इसम हरणांचे मांस विक्रीसाठी येणार आहेत.
या माहितीच्या आधारे खांडवी यांनी आपल्या विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे यांना वनविभागाशी संपर्क करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात.
याप्रमाणे मालेगाव चे उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे व पोलीस उपनिरीक्षक घुगे यांच्या संयुक्त पथकाने दरेंगाव शिवारातील गट नंबर 68 मधील निळ्या व पांढऱ्या रंगाचे पत्र्याच्या शेड मध्ये छापा टाकला असता तेथे आरोपी 1) मुद्स्सीर अहमद अकिल अहमद वय 37 रा चुनभूट्टी बेलबाग 2) शेख शब्बीर शेख रजाक वय 41 रा गल्ली नंबर 3 कमालपुरा 3) सैय्यद मुबिन सैयद हारून वय 43 रा सर्वे न 15 कमालपुरा सर्व राहणार मालेगाव जिल्हा नाशिक हे चिंकारा जातीचे हरणांची शिकार करून आणलेले मांसा च्या तुकड्यासह आढळून आले.
आरोपी विरुद्ध वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम 1972 चे कलम 9,39,48 अनव्य गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे .
त्यांच्या ताब्यातून मांसा चे मोठया आकाराचे 9 तुकडे,होंडा कंपनी ची काळ्या रंगांची दुचाकी, कुंदा ( लाकडी ठोकळा),असा सुमारे 1 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संयुक्त कार्यवाहीत वनविभागाचे वनपाल आर व्ही देवरे, बी एस सुर्यवंशी, वनरक्षक एस बी शिर्के, आगार रक्षक आर के बागुल, रफिक पठाण, टी जी देसाई ,विशेष पोलीस पथकातील पोलीस हवालदार वसंत महाले, विकास शिरोळे, पोलीस कर्मचारी संदीप राठोड, भूषण खैरणार, पंकज भोये, आदी सहभागी होते
अधिक तपास उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी येडलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विलास डी कांबळे करीत आहेत.

Previous articleतळसंदे येथील उरूस बंद
Next articleकोल्हापुरात पोलिसांनी  महापालिका आयुक्तानाच १८८ प्रमाणे कारवाई करण्याचा दिला दम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here