Home कोल्हापूर कोल्हापुरात पोलिसांनी  महापालिका आयुक्तानाच १८८ प्रमाणे कारवाई करण्याचा दिला दम

कोल्हापुरात पोलिसांनी  महापालिका आयुक्तानाच १८८ प्रमाणे कारवाई करण्याचा दिला दम

107
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापुरात पोलिसांनी  महापालिका आयुक्तानाच १८८ प्रमाणे कारवाई करण्याचा दिला दम

कोल्हापूर : (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत जमावबंदी जारी केली आहे शुक्रवारी रात्री जमावबंदीत महाद्वार चौकात दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तात भाविकांची गर्दी हटवत होते, दरम्यान त्यावेळि एका आलिशान चारचाकी वाहनातून महिला व चालकासह हटकले. मॅडम जमावबंदी आदेशात गाडी कुठं फिरवताय दंडाची पावती करावी लागेल अथवा तुमच्यावर १८८ प्रमाणे कारवाई करवी लागेल, असा दम दिला. पण नंतर त्या मॅडम म्हणजे स्वत: कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन तथा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व गाडी चालविणारे हे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे होते हे ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी मात्र त्या दोघा पोलिसांना धक्काच बसला.
आयुक्तानी ,अधिक्षकांनी, त्या दोघां पोलीसांचे प्रामाणिक कर्तव्याबद्दल कौतुक करून त्यांना रिवाॅर्ड जाहीर केले.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पो.कॉ. संजय मासरणकर व शहर वाहतूक शाखेचे पो.कॉ. संजय महेकर यांच्या या प्रामाणिक कर्तव्याची चर्चा संपूर्ण पोलीस खात्यात रंगली आहे.
कोल्हापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला. शुक्रवारी रात्री श्री महालक्ष्मी देवीची मंदिच्रया आवारात पालखी झाली. भाविकांनी महाद्वारातूनच दर्शन घेतले.
तेथे बंदोबस्ताला असलेले जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील संजय मासरणकर व वाहतूक शाखेचे संजय महेकर यांनी परिसरातील गर्दी हटवली. रात्री सव्वादहाला त्यांनी काळ्या रंगाच्या मोटारीलाही पुढे जाण्यास अटकाव केला.
‘मॅडम, कुठे फिरताय, जमावबंदी आहे, पेपरात वाचले की नाही, तुमच्यासारखी सुशिक्षित माणसे अशी वागली, तर इतरांनी काय करायचे’ असा जाब विचारला. मॅडमनी, ‘एक मिनिटात देवीचे दर्शन घेतो,’ अशी विनवणी केली, तरीही त्यांची गाडी पुढे सोडली नाही. उलट, मासरणकर यांनी पुढे होऊन सहकारी वाहतूक शाखेचे महेकर यांना दंडाची पावती करा, दंड देत नसतील तर त्यांच्यावर १८८ प्रमाणे गुन्हा नोंदवा, असा दमच दिला.
त्यानंतर मॅडमनी चेहऱ्यावरील स्कार्प काढला व शेजारी साहेब बसलेत, असे कॉ. मासरणकरला सांगितले. ते दंडाची पावती करताना, चालकाने मोटारीची काच खाली केली, तेथे अधीक्षक शैलेश बलकवडे दिसताच दोघांचीही भंबेरी उडाली. दोघांनीही साहेबांना सॅल्युट केला. साहेब व मॅडम यांनी मोटारीतून उतरुन दोघा प्रामाणिकपणे उत्कृष्ट, कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या पाठीवर प्रामाणिकपणाची थाप मारुन काैतुक केले.

Previous articleमालेगांवात हरिणाची शिकार करुन मास विकणा-यांना अटक
Next articleसंपूर्ण लॉकडाउनची घोषणा आजच?; मुंबईच्या पालकमंत्र्यांचे संकेत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here