Home मुंबई संपूर्ण लॉकडाउनची घोषणा आजच?; मुंबईच्या पालकमंत्र्यांचे संकेत

संपूर्ण लॉकडाउनची घोषणा आजच?; मुंबईच्या पालकमंत्र्यांचे संकेत

76
0

राजेंद्र पाटील राऊत

🔏 संपूर्ण लॉकडाउनची घोषणा आजच?; मुंबईच्या पालकमंत्र्यांचे संकेत
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

.

▪️ करोनाच्या वाढत्या परिस्थितीला लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे सर्वच अधिकाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याबाबत राज्य सरकारने निश्चित केले आहे. हा लॉकडाउन कधी करायचा याबाबत कालपर्यंत चर्चा सुरू होती. मात्र, रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अधिक वेळ दवडण्यात अर्थ नसल्याचं सरकारचं मत बनलं आहे. त्यामुळं संपूर्ण लॉकडाउनची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे.

▪️ गुढीपाडवा आणि डॉ. बाबासोहब आंबेडकर जयंती झाल्यानंतर गुरुवार, १५ एप्रिल रोजी लॉकडाउन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पंढरपूर शहरातील पोटनिवडणुकीसाठीचा प्रचारही संपणार आहे. त्यामुळं गुरुवारी संध्याकाळपासून लॉकडाउन लागू होईल.

📍 १५ एप्रिल ते ३० एप्रिल असा लॉकडाउनचा कालावधी असू शकतो. १ मे रोजी सरकारी सुट्टी असल्याने २ मे पासून पुन्हा राज्यातील परिस्थिती पूर्ववत करता येऊ शकते. मात्र, विरोधकांची तयारी न दर्शविल्यास लॉकडाउनचा कालावधी कमी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Previous articleकोल्हापुरात पोलिसांनी  महापालिका आयुक्तानाच १८८ प्रमाणे कारवाई करण्याचा दिला दम
Next articleभारतात गेल्या २४ तासांत १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद; ८७९ मृत्यू=
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here