Home Breaking News 🛑 जोगेश्वरीत कचऱ्याच्या ढीगाऱ्यात सापडली शेकडो आधार कार्ड 🛑

🛑 जोगेश्वरीत कचऱ्याच्या ढीगाऱ्यात सापडली शेकडो आधार कार्ड 🛑

95
0

🛑 जोगेश्वरीत कचऱ्याच्या ढीगाऱ्यात सापडली शेकडो आधार कार्ड 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 4 सप्टेंबर : ⭕ जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर प्रताप नगर स्मशानभूमी परिसरास शेकडो आधार कार्ड आणि बॅंकांची पत्र कचऱ्याच्या ढीगाऱ्यात आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोस्टाच्या अनागोंदी कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप जनता जागृती मंचने केला आहे. या ढीगाऱ्यातील सर्व महत्वाची कागदपत्र जोगेश्वरीतील रहीवाशांची आहेत. एका महिन्यापासून त्यांना ही कागदपत्र पोस्टाकडून मिळणं अपेक्षित होतं.

प्रताप नगर स्मशानभूमी जवळच्या कचरा वेचकाने एका महिन्यापुर्वी गोळा केलेला ओला कचरा सुकवण्यासाठी टाकला होता. या कचऱ्यावर स्थानिकांची नजर गेली आणि त्यांना धक्काच बसला. साधाराण १५० ते २०० आधार कार्ड आणि बॅंकाचे पत्र या कचऱ्यात सापडली. जनता जागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार देणार असल्याने नितीन कुबल यांनी सांगितले.

नागरिकांनी याबद्दल अधिक चौकशी केली असता या प्रकारामुळे पोस्टातून एका पोस्टमनला काढून टाकल्याची माहिती त्यांना मिळाली. केवळ एकाला जबाबदार धरुन चालणार नाही. तर पोलिसांनी पोस्ट मास्टरला किंवा संबधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी जनता जागृती मंचाने केलीय. जनता जागृती मंचच्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह करत याबद्दल माहिती देण्यात आली. ⭕

Previous article🛑 आता फक्त ३० मिनिटांत हवं ते मिळणार! Amazon करणार ड्रोनने डिलिव्हरी
Next article🛑 ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ घेऊन येणार १० नव्याकोऱ्या वेब सिरीज 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here